Homeक्राइमFraud : फसवणुकीच्या गुन्ह्यांत दिल्लीतील व्यावसायिकाला अटक; खुर्च्यांसाठी घेतलेल्या पैशांच्या अपहाराचा आरोप

Fraud : फसवणुकीच्या गुन्ह्यांत दिल्लीतील व्यावसायिकाला अटक; खुर्च्यांसाठी घेतलेल्या पैशांच्या अपहाराचा आरोप

Subscribe

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दिल्लीतील व्यावसायिकाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. जावेद बुनदू खान असे या व्यावसायिकाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे.

मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दिल्लीतील व्यावसायिकाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. जावेद बुनदू खान असे या व्यावसायिकाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्या कंपनीने खुर्च्यांसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून एका खासगी कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. (delhi businessman arrested for fraud; allegation of misappropriation of money taken for chairs)

फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत जावेद सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार मुंब्रा येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. जावेद हा दिल्लीत राहत असून त्याची ए टू झेड नावाची एक कंपनी आहे. तक्रारदाराच्या कंपनीने त्याच्या कंपनीकडे 250 खुर्च्यांची ऑर्डर दिली होती. त्यासाठी जीएसटी मिळून त्यांना सात लाख रुपयांचे पेमेंट करायचे होते.

- Advertisement -

हेही वाचा – SC Collegium : न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल होणार; सर्वोच्च न्यायालय कॉलेजिअमचा मोठा निर्णय

यातील 3 लाख 87 लाखांचे पेमेंट केले, उर्वरित पेमेंट खुर्च्यांची डिलिव्हरी केल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही जावेदने त्यांच्या कंपनीने ऑर्डर केलेल्या खुर्च्यांची डिलीव्हरी केली नव्हती. विचारणा केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. पैशांची मागणी करूनही तो त्यांचे पेमेंट परत करत नव्हता. त्यामुळे कंपनीच्या वतीने तक्रारदारांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

- Advertisement -

याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी जावेद खानचा शोध घेण्यास सुरुवात केली. वर्षभरापासून तो फरार होता. अखेर बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत त्याला नंतर बोरिवलीतील स्थानिक न्यालयालया हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (delhi businessman arrested for fraud; allegation of misappropriation of money taken for chairs)

हेही वाचा – Kumar Vishwas on Baba Ramdev : …अन्यथा मीठ सडले असते, कुमार विश्वासांचा बाबा रामदेवांवर निशाणा


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -