घरमुंबईदिल्लीच्या उपराज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा, दिले 'हे' कारण

दिल्लीच्या उपराज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा, दिले ‘हे’ कारण

Subscribe

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण समजू शकलेले नाही. या आधी दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग होते. अनिल बैजल यांचे दिल्ली सरकार बरोबर काही दिवसांपासून वाद सुरू होते. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर काम करू न देण्याचा आरोप लावला होता. मिळालेल्या माहिती नुसार वैयक्तिक कारण देत त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नोटिशीला दिले उत्तर, अटींचा भंग झाला नसल्याचा केला दावा

- Advertisement -

अनिल बैजल हे 1969 च्या केंद्र शासित प्रदेश बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. डिसेंबर 2016 मध्ये त्यांना दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. मागच्या 31 डिसेंबरला त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दिल्लीत तिथल्या प्रशासकीय निर्णयात उपराज्यपालांची भूमिका महत्वाची असते. 2015 पासून दिल्ली आणि केंद्र सरकारच्या परस्पर विरोधी भूमिकांमुळे प्रशासकीय प्रकरणात संघर्षाची स्थिती राहीली होती. त्यांनी अलाहाबाद विद्यापिठातून आणि ईस्ट एंगिला विद्यापिठातून शिक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने केली – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे प्रशासकीय प्रमुख उपराज्यपाल असतील, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे दिल्लीचे उपराज्यपाल पद महत्वाचे झाले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -