घरमुंबई'त्या' SIT रिपोर्टमधील सर्वांवर कारवाईची मागणी; आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

‘त्या’ SIT रिपोर्टमधील सर्वांवर कारवाईची मागणी; आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Subscribe

मुंबई : अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागपूर पोलिसांच्या खास विशेष तपास पथकाने (SIT) एक रिपोर्ट दिला होता, त्या रिपोर्टमधील सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडर यांनी केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अकोल्यातली दंगल मानव निर्मित होती. त्या दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी डीजीए अमरावती रेंजचे अकोल्याच्या एसपींना साहाय्य करत आहेत. परंतु तिथे पुन्हा घटना घडतील अशी तुरळक परिस्थिती आहे. त्यामुळे दंगल खोरांना अरेस्ट करण्यासंदर्भात आम्ही एसपींना कारवाई करण्यास सांगितली होते. पण आम्ही सांगितल्याप्रमाणे कारवाई झाली नसल्यामुळे काही जणाचं मनोबल वाढेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना एसआयटीसंदर्भात माहिती दिली.

- Advertisement -

एसआयटी रिपोर्टनुसार कारवाई व्हावी
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, नागपूर एसआयटीने 6 महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट दिला होता. त्या रिपोर्टमध्ये कधी-कधी, काय-काय घडू शकते त्या संदर्भात सर्व नमूद करण्यात आले होते. तो रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही, पण त्या रिपोर्टमधील माहीती आम्हाला मिळाली आहे. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहेत, त्या सर्वांवर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे, त्या एसआयटीच्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आहेत किंवा जे दंगलीशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दंगलीमागे हात असणाऱ्यांवर कारवाई करा
दंगली वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी दक्षता घेतली जात नाही आणि मोठी कारवाई होत नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाही. कॅमेरामध्ये दिसला म्हणून अटक केली, असे करण्यापेक्षा या दंगलीमागे ज्यांचा हात आहे, त्यांना पकडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, या दंगलीमागे असणाऱ्यांवर कारवाई करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -