घरमुंबईमुंबईत डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव; ड्रोनच्या माध्यमातून होणार जंतुनाशक फवारणी

मुंबईत डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव; ड्रोनच्या माध्यमातून होणार जंतुनाशक फवारणी

Subscribe

मुंबईत ड्रोनच्या माध्यमातून डेंग्यू उत्पत्तीची ठिकाणं शोधून फवारणी होत असताना महापौरांकडून पाहणी

मुंबईत मलेरिया, डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असून इतर पावसाळी आजारदेखील वाढले आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना रुग्ण अधिक असलेल्या रुग्णालयांमध्ये आता पावसाळी आजारांच्या रुग्णांची वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील स्लम भागात ड्रोनच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली.

महापौर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जी/ दक्षिण विभागातील सर्व वॉर्डमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौरांनी सांगितले. कमी पैशात जास्त परिणामकारकता यातून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास यामुळे हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये सुद्धा काळजी घेणे गरजेचे असून घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले.

- Advertisement -

धोबीघाट सारख्या परिसरात ड्रोनच्या माध्यमातून डेंग्यू उत्पात्तीची ठिकाणं शोधून जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी ही जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे अशा ठिकाणी स्वतः महापौर किशोरी ताई पेडणेकर या उपस्थितीत राहणार असून पाहणी त्या करणार आहेत. मुंबई महापालिकेकडून आजपासून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सर्वप्रथम धोबीघाट परिसरातून सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाच्या डासांची पैदास, उत्पत्ती होत असते अशा ठिकाणांचा शोध महापालिकेकडून नेहमी घेतला जातो. मात्र आता थेट ड्रोनच्या माध्यमातूनच डेंग्यूच्या उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ही फवारणी केली जाणार आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी रविवारी महापौर निवासस्थानी डेंग्यू, मलेरियाच्या साथीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माटुंगा, सायन येथील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पाणी कुठल्याही प्रकारे साचून राहू नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. मुंबईत डेंगू मलेरियाच प्रमाण वाढत आहे. साचलेल्या पाण्यात डेंगूच्या आळ्या तयार होत असतात. पालिकेकडून पाणी साचू देऊ नये असे आव्हान केले जात आहे. मुंबईत इमारतीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना याठिकाणी पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत. त्यामुळे पाणी साचू देऊ नका, असे आवाहन महापौरांनी या पाहाणीच्या वेळी नागरिकांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी, परळ आणि वांद्रे पश्चिम या भागांत आढळले आहेत. मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने १३ लाख १५ हजार ३७३ घरांची पाहणी केली आहे. तसेच यातील ११ हजार ४९२ डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.


कोस्टल रोड प्रकल्पात १ हजार कोटींचा घोटाळा; भाजपचा शिवसेनेवर गंभीर आरोप

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -