मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबईतील शहर आणि पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये (Dengue Patients) वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाला असला तरी, अद्याप साथीचे आजार नियंत्रणात आहेत, मात्र डेंग्यूचा प्रसार वाढत आहे. मुंबईच्या कन्नमवार नगर, टागोर नगर परिसरात डेंग्यूंचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याचे समजते. (Dengue patients increased in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. जून २०२१ मध्ये डेंग्यूच्या एकूण १२ रुग्णांची नोंद झाली होती. तर चालू वर्षात जून महिन्यात आतापर्यंत हा आकडा तब्बल ३३ वर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही आता सतर्क झाली असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

डेंग्यू हा आजार डासांपासून पसरतो. त्यामुळे आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापैकी कोणतेही लक्षण दिलल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. हा आजार अधिक बळवल्यास जीवघेणा देखील ठरण्याची शक्यता असते. डेंग्यू हा एडीस इजिप्ती या जातीच्या डासाची मादी चावल्यास होतो. डेंग्यू हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही, हा रोग केवळ संक्रमित डास चावल्यास होतो.

डेंग्युची लक्षणे

  • तीव्र ताप येणे.
  • डोके दुखी, डोळे जळजळणे, डोळे दुखणे,
  • डेग्यूमध्ये तोंडची चव जाणे.
  • भूक न लागणे.
  • अशक्तपणा वाटणे.
  • मळमळ आणि उलट्या होणे.
  • रुग्णांच्या त्वचेवर व्रण देखील उठणे.

हेही वाचा – शिंदे-ठाकरे गटात उडी घेत बृजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा