घरCORONA UPDATEमुंबईकरांना सकस, चांगल्या दर्जाचे मटण पुन्हा मिळणार!

मुंबईकरांना सकस, चांगल्या दर्जाचे मटण पुन्हा मिळणार!

Subscribe

मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह पुन्हा एकदा खुले होणार आहे. येत्या ३ जुलैपासून पशुवधगृहात शेळ्या-मेंढ्या आणण्यास परवानगी दिली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर हे पशुवधगृह सुरु केला जात असल्याने महापालिकेच्या प्रमुख मंड्यांमध्ये आता मटण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता मटण सहज उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या लॉक-डाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं देवनार पशुवधगृह बंद करण्यात आलं होतं. मागील तीन महिन्यांपासून देवनार पशुवध गृह बंद होतं.

देवनार पशुवधगृहात दरदिवशी दोन पाळ्यांमध्ये शेळ्या-मेंढ्या, डुक्कर तसेच मोठी जनावरे यांची कत्तल केली जाते. एका पाळीमध्ये ३०० शेळ्या, ६ हजार बकरे, ३०० डुक्कर आणि ३०० मेाठी जनावरे कापली जातात. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या पशुवधगृहाचे कामकाज मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार प्रायोगिक तत्वावर हे पशुवधगृह सुरु करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार २ जुलैपासून सुरु होणाऱ्या पशुवधगृहात प्रत्येक व्यापाऱ्याने शेळ्या-मेंढ्या आदी जनावरे विक्रीसाठी आणण्यासाठी मुख्य निरीक्षक (पशुधन) विभागातून आयात परवाना घेणे आवश्यक आहे. त्यामुळे २ जुलैपासून देवनार पशुवधगृहात पशुवधाकरता शेळ्या-मेंढ्या आणण्यास परवाना देण्यात येणार आहे. हा परवाना रविवार ते शनिवार या ७ दिवसांसाठी वैध असेल.

- Advertisement -

प्रत्येक दिवशी शेळ्या-मेंढ्यांसाठी फक्त ४० वाहनांना परवानगी असेल. या परवान्याचा वापर फक्त पशुवधगृहामध्ये शेळ्या-मेंढ्या वध करण्यासाठी आयात करण्याकरता असेल. या परवान्यावर मुंबई शहरात इतरत्र जनावरे घेऊन जाता येणार नाहीत, असे पशवुधगृहाचे महाव्यवस्थापक योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या पशुवधगृहात एकाच पाळीमध्ये काम केले जाणार असून एका पाळी एरवी कापल्या जाणाऱ्या जनावरांच्या ५० टक्के एवढ्या जनावरांची कत्तल केली जाणार आहे. दिवसाला ३ हजार बकरे, १५० शेळ्या, १५० डुक्कर आणि १५० मोठी जनावरे आदींचे मटण मुंबईतील विविध परवानाधारक मटण विक्रेत्यांना पुरवले जाईल. ज्यामुळे मुंबईकरांना पुन्हा चांगल्या दर्जाचे मटण महापालिकेच्या मंडईत उपलब्ध होईल, असे योगेश शेट्ये यांनी स्पष्ट केले. यासाठी जी आवश्यक खबरदारी घ्यायची आहे, ती घेतली जाईल. मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कर्मचाऱ्यांकडून केले जाईल. तसेच आयात करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -