घरCORONA UPDATEबांधकाम मजुरांना विकासकांनी वाऱ्यावर सोडले; पण महापालिकेने तारले

बांधकाम मजुरांना विकासकांनी वाऱ्यावर सोडले; पण महापालिकेने तारले

Subscribe

विकासकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मजुरांच्या पालनपोषणाचा भार महापालिकेने उचलून त्यांना दुपारी व रात्री खिचडीसह जेवणाची पाकिटे पुरवली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या कामगार आणि मजुरांनी आता हळूहळू गावाचा रस्ता धरण्यास सुरुवात केली आहे. या मजुरांना रेल्वेसह इमारत बांधकाम आणि विविध विकास कामांसाठी मुंबईत आलेल्या मजुर कामगारांचा समावेश आहे. परंतु यामध्ये मुंबईत सुरु असलेल्या विकासकांनीही बांधकामे बंद केल्यामुळे तेथे काम करणाऱ्या मजुरांची मोठे हाल झाले. विकासकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मजुरांच्या पालनपोषणाचा भार महापालिकेने उचलून त्यांना दुपारी व रात्री खिचडीसह जेवणाची पाकिटे पुरवली. विकासकांनी वाऱ्यावर सोडल्याने, अखेर या कामगार मजुरांनी पैसे न घेताच गावाचा मार्ग धरल्याचे माहिती मिळत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे मुंबईतील सर्वच विकासकामे तसेच बांधकामे ठप्प झाली आहेत. मात्र, यामध्ये मुंबईतील अनेक इमारत बांधकामेही ठप्प झाल्याने, त्याठिकाणी बांधकाम मजुरांना घेवून येणाऱ्या कंत्राटदाराने पाठ फिरवली. मुंबई सुमारे दोन हजारांच्या आसपास बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे त्याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचे मोठे हाल झाले होते. गावी जायचे तर वाहतूक बंद आणि इथे राहिलो तर भूकेने मरू अशी अवस्था मजुरांची होती. यातच या मजुरांचा भार मुंबई महापालिकेने उचलला. मुंबईत अडकलेल्या अनेक कामगार, मजुरांना दोन वेळचे जेवण पुरवताना, महापालिकेने इमारत बांधकामाच्या ठिकाणीही जेवणाची पाकिटे पुरवायला सुरुवात केली. त्यामुळे किमान महापालिकेच्यावतीने मिळणाऱ्या जेवणामुळे हे मजुर मुंबईत थांबून राहिले.

- Advertisement -

महापालिकेच्या जेवण वाटणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी महापालिकेला इमारत बांधकामाच्या ठिकाणीही जेवणाची पाकिटे वाटावी लागली. खरे तर त्या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था संबंधित बांधकाम विकासकाने किंवा त्यांच्या कंत्राटदाराने करायला हवी. परंतु कंत्राटदारच पळून गेल्याने अनेक बांधकामांच्या ठिकाणी मजुरांवर भुकेने मरण्याची वेळ आली होती. परंतु मानवतेच्या दृष्टीकोनात या मजुरांना महापालिकेला जेवणाची पाकिटे वाटावी लागली. अनेक बांधकामांच्या ठिकाणी तर मजुरांना कंत्राटदाराने चार ते पाच महिन्यांचा पगारही दिला नव्हता. त्यामुळे अनेक मजुरांचे पैसे कंत्राटदारांकडे अडकले असले तरी जीव वाचवण्याच्या भीतीने बऱ्याच मजुरांनी गावाचा रस्ता धरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

चेंबूर घाटला येथे अनेक इमारत बांधकाम मजुरांचे जेवणाचे हाल होते. ही बाब लक्षात येताच स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर त्यांना महापालिकेच्यावतीने प्राप्त होणाऱ्या जेवणाची पाकिटे उपलब्ध करून दिली. परंतु या मजुरांची जबाबदारी ही संबंधित विकासकांची असल्याने त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत त्यांना मजुरांची काळजी घ्या. त्या महिन्याभराचे रेशन उपलब्ध करून द्या अशी सूचना केली. परंतु त्यानंतरही विकासक किंवा त्या कामगारांच्या कंत्राटदारांने मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली नाही. शीव-माटुंगा पश्चिम येथेही अशाचप्रकारे एका इमारत बांधकामांच्या ठिकाणी मजुरांचे हाल होत असल्याने तेथील मंजुरांना जेवणाची पाकिटे पुरवावी लागल्याचे स्थानिक नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले. मजुरांच्या कंत्राटदारांनीही त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने येथील सर्व मजूर एक दिवस पूर्ण सामान घेवून बाहेर पडले होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या सर्वांना आतमध्ये पाठवून त्यांची नोंदणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -