धनगर समाजाला २५ हजार घरं देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

२५ हजार घरं ही धनगर समाजाला देणार आहोत, असं आश्वासन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

Devendra-Fadnavis-On-Dhanagar-Samaj

मेंढपाळांना आजही त्यांचं हक्काचं घर नाही. गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक घरांच्या योजना तयार होत असतात. परंतू सर्व समाजाच्या तुलनेत आजही धनगर समाजाला पाहिजे त्या प्रमाणात घरं मिळत नाहीत. म्हणून यावेळी ठरवलं की घरं तर बांधायचीच. पण त्यातली २५ हजार घरं ही धनगर समाजाला देणार आहोत, असं आश्वासन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

मुंबई नुकताच धनगर समाजाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या कल्याणकारी योजना दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी धनगर समाजाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पिवळ्या रंगाचा फेडा, घोंगडी चढवत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजातील बांधवांशी संवाद साधताना त्यांनी हे आश्वासन दिलंय.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलाय. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून विरोधकांनी लागोपाळ अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या टीका केल्या आहेत. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आम्ही हवेत घोषणा करत नाही. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून विरोधकांचा एकच सवाल आहे की पैसा येणार कुठून? पैशाची तरतूद केली नाही. पैसा दिसत नाही. बजेट तयार करत असताना ज्या काही घोषणा आणि प्रशासकीय मान्यता असतात, त्याची किंमत दर्शवली जाते. ज्या घोषणांच्या प्रशासकीय मान्यता नसतात, त्याला कॅबिनेट आणि विधिमंडळ मान्यता देते. त्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता आपण घेतो. त्यामुळे विरोधकांना बजेटविरोधात बोलायला काही उरलं नाही. विरोधक केवळ निष्फळ टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत.” तसंच ज्यावेळेस मी बजेट बनवतो त्यावेळेस मी सगळ्या गोष्टींचा विचार करून बनवतो, असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

“तसंच अर्थसंकल्पात ज्या ज्या घोषणा केल्या आहेत, त्या अस्तित्वात आणण्याचं काम आमचं आहे. विरोधकांचं काम टीका करणं आहे. ते फक्त टीका करतील. पण मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. आम्ही विकास करत राहणार. तळागळातील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करणार,” असं बोलून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तसंच जेव्हा समाजातील तळागळातील लोकांपर्यंत अर्थसंकल्पातील सर्व योजना पोहोचतील, तेव्हाच मी या सत्काराला पात्र होईल, असं देखील फडणवीस म्हणाले.

“तसंच मोदी सरकार सतत गरिबांचा विचार करते, त्यामुळे आपले सरकार मेंढपाळांच्या पाठीशी आहे. हे सरकार वंचितांना न्याय देईल. समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल”, असं आश्वासन देखील यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिलंय.