Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबई पालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स डिपॉझिट करत आपली घरं भरली - फडणवीस

मुंबई पालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फिक्स डिपॉझिट करत आपली घरं भरली – फडणवीस

Subscribe

मुंबईसारखं इतक महत्त्वाचं शहर, या शहरात रोज हजारो- हजारो नाहीतर करोडो करोडो लिटर पाणी कुठलीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडलं जातं. यामुळे समुद्रातून खाण वास आणि समुद्र खाण होतोय. 20-20 , 25 -25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली आणि केवळ स्वतःची घरं भरली, पण मुंबईकरांनी शुद्ध पाणी देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, अशा शब्दात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

भागीदारी मिळत नव्हती पालिकेने त्या कामास नकार दिला 

मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेला सांगितलं होत ही, कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी असं सोडता येणार नाही, यासाठी पालिकेला एचटीपी तयार करावे लागतील. त्यावेळी महापालिकेने सांगितलं आम्ही एचटीपी तयार करू पण ते कोणत्या नियमाने तयार करायचे हेच त्यांना माहित नव्हते. यानंतर मोदी सरकारकडे जाऊन आम्ही निवेदन दिले की, हे पाणी समुद्रात सोडायचं असेल तर त्यासाठी नियम तयार करावे लागतील. यावेळी मोदी सरकारने डिस्चार्ज नियम तयार करून मुंबई महापालिकेला दिले. त्यावेळी केंद्राने नियम तयार असल्याचे सांगत ते पाणी समुद्रात सोडू नका असे सांगितलं. पण त्यानंतरही मुंबई पालिका 3 वर्षे हे काम करुन शकली नाही कारण.. करणारे नव्हते असं नाही, तर करणारे होते, पण पालिकेचं त्यांच्यासोबत पटत नव्हतं. का तर, भागीदारी मिळत नव्हती म्हणून त्यांनी यास नकार दिला, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

- Advertisement -

यावर फडणवीस पुढे म्हणाले की, आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या कामांना गती दिली आणि गतीने हे काम पूर्ण केलं जात आहे, या त्याचं प्रकल्पाचं उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. हे केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदींच्या सरकारमुळे शक्य आहे म्हणत फडणवीसांनी  मोदींचे आभार मानले.

मुंबईत असे रस्ते बनवणार ज्यावर ४० वर्षात एक खड्डाही पडणार नाही

यासोबत 6 हजार कोटींचे रस्ते तयार होणार आहे, काहींनी प्रश्न विचारला की, काँक्रिटचे रस्ते का बनवत आहे? ते यासाठी बनवत आहोत कारण चार वर्षांपूर्वी आम्ही मुंबईच्या रस्त्याचं परीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की, या रस्त्यांच्या खालील लेअरचं गायब आहे, याप्रकारचा भ्रष्ट्राचार… दरवर्षी तेच रस्ते दरवर्षी तेच रस्ते, यानंतर आम्ही निश्चय केला की, आता असे रस्ते बनवणार ४० वर्षात त्या रस्त्यांवर एक खड्डाही पडणार नाही. याचही निर्णय मुख्यमंत्री घेतला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचंही भूमिपूजन होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मुंबईची ओळख काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन ही मुंबईची ओळख आहे. त्याचाही कायापालट होणार आहे, असही फडणवीसांनी नमूद केलं आहे.


काही लोकांच्या बेईमानीमुळे अडीच वर्षे डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -