घरCORONA UPDATECorona : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे तीन मागण्या!

Corona : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांकडे तीन मागण्या!

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनतेला देखील मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याचमुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तीन मागण्या केल्या आहेत. रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्या, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेससाठी महत्त्वाची साधनसामग्री तात्काळ उपलब्ध करा आणि तबलीगी संदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करा, अशा तीन मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केल्या आहेत. राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना आणि त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. १६ राज्यांनी रेशनकार्ड नसतानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांचे धान्य त्वरीत उपलब्ध करुन द्यावे. शिधापत्रिका नसल्यास आधार कार्ड प्रमाण मानावे, तेही नसल्यास यादी तयार करुन प्रमाणित करा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

मुंबईतील रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची कमतरता असल्याचं समोर येत आहेत. त्यांनाही कोरोना रोगाने ग्रासल्याने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तबलीगी जमातच्या मकरजमधून आलेले अनेक जण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गेले आहेत. दिल्लीतील कार्यक्रमाला उपस्थित नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेले इतर संशयित यांच्याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई करा. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत ही संख्या मोठी असल्याने कडक कारवाई करा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -