घरमुंबईसंजय राठोडांवर भाजपा नेत्यांनी केली होती टीका; सोमय्या, फडणवीसांचा जुना व्हिडीओ व्हायरल

संजय राठोडांवर भाजपा नेत्यांनी केली होती टीका; सोमय्या, फडणवीसांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Subscribe

चित्रा वाघ यांनी हे प्रकरण आणखी उचलून धरावं आणि पुरावे हवे असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यावेत अशी उपरोधिक टीकाही नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.

पुण्यात पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली होती. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी तिला फसवल्यामुळे तिने आत्महत्या केला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधक असलेल्या भाजपने हे प्रकरण लावून धरले. अखेर संजय राठोड यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र, आता हेच संजय राठोड भाजपच्या मांडीला मांडी लावून मंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज १८ मंत्र्यांनी गोपयनियतेची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, यामध्ये संजय राठोडही येतात. त्यामुळे त्यावेळी भाजपने केलेल्या आरोपांचे ऑडियो क्लिप आता व्हायरल होत आहेत. (Devendra Fadnavis and Kirit Somiayya old videos viral of Sanjay Rathod controversry)

हेही वाचा – संजय राठोड यांना क्लीनचिट मिळाल्याने मंत्रिमडळात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

- Advertisement -

७ फेब्रुवारी २०२१ रोजी पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर १ मार्च २०२१ रोजी देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता. मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं” असं फडणवीस म्हणाले होते.

फडणवीसांची ही प्रतिक्रिया आता प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच, चित्रा वाघ यांनी हे प्रकरण आणखी उचलून धरावं आणि पुरावे हवे असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यावेत अशी उपरोधिक टीकाही नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -


देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्या यांनीही संजय राठोड यांच्यावर टीका केली होती. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात ते म्हणाले होते की, “संजय राठोडांची हकालपट्टी नाही, तर अटक व्हायला हवी. पूजा चव्हाणची आत्महत्या नसून हत्या आहे. संजय राठोड यासाठी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहात आहेत का?” असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओमध्ये विचारला होता.


दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिपद देणं हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचं देवेंद्र फडणीवस यांनी आज स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तार : पंकजा मुंडेंची अनुपस्थिती खटकणारी, तावडेंची हजेरी

तसेच, शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी “महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांनी संजय राठोड यांना त्या प्रकरणाच क्लीनचिट दिली होती. त्यामुळे त्यांचे राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यावर आणखी कोणाचे काही मत अथवा सागणे असेल, ते नक्की ऐकून घेतले जाईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ”लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे”, असे चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले. याशिवाय “पोलिसांनी त्यावेळी या प्रकरणाचा तपास केला होता. त्या तपासामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -