Eco friendly bappa Competition
घर मुंबई Devendra Fadnavis : मुंबईच्या डबेवाल्याना मिळणार हक्काचे घर; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Devendra Fadnavis : मुंबईच्या डबेवाल्याना मिळणार हक्काचे घर; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Subscribe

मुंबईः मुंबईतील डबेवाले कामगारांसाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. या धोरणामुळे मुंबईत दुपारच्या जेवणाचे डबे पोहचविणाऱ्या कामगारांना हक्काचा निवारा मिळणार आहे.

फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी आज  मुंबईतील डबेवाला कामगारांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीला  आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन बाॅक्स सप्लायर्स चॅरीटी ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचाःMumbai Local Mega block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई डबेवाले कामगार यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. यामुळे यांसारख्या अन्य इतर घटकांनाही लाभ मिळू शकेल. शहरे विकसित करताना विविध प्रकल्पांच्या उभारणीत गृहनिर्माणाचा साकल्याने विचार करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी  बैठकीत सांगितले.

- Advertisement -

मुंबईतील डबेवाले चाकरमान्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. मुंबई हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने मुंबई आणि  नजीकच्या परिसरात त्यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत  श्रीकांत भारतीय यांनी यावेळी मांडले.

गर्भवती माता आणि बालकांसाठी ‘किलबिलाट ॲम्ब्युलन्स’

गर्भवती माता आणि बालक यांच्यासाठी आल्हाददायक वातावरण असलेली ‘किलबिलाट ॲम्ब्युलन्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिली.   देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गर्भवती माता आणि बालकांना चांगली सुविधा मिळणार असून, ज्या बालकांना कोणी पालक नाही, अशा बालकांचे पुनर्वसन करणे त्यांना योग्य उपचार मिळवून देणे, ही सेवा प्राधान्याने दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी महिला व बालविकास विभाग, जिल्हा नियोजन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मी अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी योजना

इमारतींच्या संदर्भातील स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाची हाल थांबविण्यासाठी या एका खिडकीच्या अंतर्गतच तीन महिन्यात काम पूर्ण करण्याची जबाबदारी विभागाची असेल, अशी माहिती देण्यात आली. तर यासाठी एका स्पेशल सेलची निर्मिती करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत या विभागाशी समन्वय साधून या सेलने तीन महिन्याच्या आत काम पूर्णत्वास न्यावे. तर या सर्व कामाच्या मध्ये लाल फित आडवी येणार नाही, याबाबतची काळजी घेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. गेल्या महिन्यात ही घोषणा करण्यात आली.

 

- Advertisment -