घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान मला आरोपीसारखे प्रश्न विचारले - देवेंद्र फडणवीस

मुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान मला आरोपीसारखे प्रश्न विचारले – देवेंद्र फडणवीस

Subscribe

पोलिसांच्या बदली प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर सायबर क्राईम पोलिसांकडून शासकीय निवासस्थान सागर बंगला येथे चौकशी झाली. पोलिसांच्या बदल्यांबाबतचा राज्य सरकारने सहा महिने दाबून ठेवलेला घोटाळा मी बाहेर काढला. पण मुंबई पोलिसांनी याआधी दिलेल्या प्रश्नावलीत आणि आजच्या प्रश्नांमध्ये मोठा फरक असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. मी साक्षीदार नव्हे तर आरोपी किंवा सहआरोपी असल्यासारखे प्रश्न मला आज विचारण्यात आले. मी विधानभवनात ज्या पद्धतीने दाऊद कनेक्शन दाखवले, विरोधी पक्षाविरोधात षडयंत्राचा गौप्यस्फोट केला आहे. म्हणूनच मी भ्रष्टाचार बाहेर काढतोय म्हणून माझ्याविरोधात हा दबाव आणला जातोय. पण या दबावाला बळी पडणार नाही, असाही खुलासा त्यांनी केला. ही सगळी राजकीय कारवाई असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

सगळ्या प्रश्नांचा रोख हा ऑफिशिअल सिक्रेसी अॅक्टचे उल्लंघन मी केला असा होता. पण घोटाळा काढून मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, त्याबाबतचे अग्रेसित केलेले पत्र हे केंद्रीय गृहसचिवांनाही हे पत्र पाठवले. पण या माहितीचे ट्रान्सस्क्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह देणार नाही अशी भूमिका मी घेतली होती. पण नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती लीक केल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला. ही माहिती आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधित असल्यानेच केंद्रीय गृहसचिव या ऑथोरिटीकडे ही माहिती मी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

नवाब मलिकांनीच डॉक्युमेंट लीक केले 

पब्लिक डोमेनमध्ये कोणतेही मटेरिअल आणले नाही. सरकारने कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार गोवू शकत नाही असाही दावा त्यांना केला. काळे कारनामे बाहेर काढले म्हणूनच ही राजकीय सूडाने झालेली कारवाई आहे. सगळ मटेरिअल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता योग्य यंत्रणेकडे दिल्याचाही दावा त्यांनी केला. चौकशी स्टेटमेंटचा उपक्रम करून सरकारला हाती लागणार नाही. सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत असाही दावा त्यांनी केला.

पुन्हा येईन सांगितल नाही

मुंबई पोलिसांचे दोन अधिकारी या चौकशीसाठी आज दुपारी १२ वाजता सागर बंगल्यावर हजर झाले. डीसीपी हेमराज सिंह राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या उपस्थितीत ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सायबर पोलिसांकडून याआधी २०२१ मध्ये टेलिग्राफ अॅक्ट आणि ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आज दोन तास चौकशी झाली. पण पोलिसांनी पुन्हा येईन हे सांगितले नसल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

संजय राऊतांसारखा चौकशीला घाबरत नाही?

माझी चौकशी का ? असे रोज घाबरत सांगत संजय राऊत केंद्रीय यंत्रणांना लक्ष्य करत पत्रकार परिषद घेतात. पण मला नोटीस आल्यावर मी स्वतः हे जाहीर केले. त्याठिकाणी मला विरोधी पक्षनेता म्हणून माझा अधिकार वापरता आला असता. पण मी चौकशीला सामोरे गेलो. खुद्द सरकारकडूनही चौकशीला हजर राहू नका असे सांगण्यात आले होते. पण मुंबई पोलिसांनी दुसरीकडे पोलिसांचे पथक पाठवले. मी चौकशीला सामोरे गेलो आहे. पण संजय राऊत मात्र माझी चौकशी का असे विचारत सतत घाबरले असल्याचे चित्र आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -