जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis criticizes NCP
Devendra Fadnavis criticizes NCP

मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, अशा मुद्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. या टिकेवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक ट्वीट करत उत्तर दिले आहे.

ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंवर ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावण्यात आला आहे. सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आपण एक मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होते ते ओठात आले. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिले आहे.