घरमुंबईपूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांनी घेतला गृहमंत्र्यांचा समाचार

पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांनी घेतला गृहमंत्र्यांचा समाचार

Subscribe

अधिवेशनापासून सरकारचा पळ

पूजा चव्हाणच्या आत्महत्येला १८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या प्रकरणात रोज नवेनवे फोटो आणि ऑडिओ क्लिप्स बाहेर येत असल्यामुळे गुंता दिवसेंदिवर वाढतच आहे. यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आण गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण प्रकरणावर गृहमंत्री का बोलत नाहीत? या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने सुरे आहे. तसेच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कोणाचा आवाज आहे. हे जनतेला कळणे आवश्यक आहे. लहान-सहान गोष्टींवर गृहमंत्री बोलतात मग आता का बोलत नाहीत असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली नाही आहे. तसेच या प्रकरणात अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक ऑडिओ क्लिप्स बाहेर येत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये कोणाचा आवाज आहे. यामध्ये कोणाला पकडले आहे. यावर तपास कुठवर सुरु आहे. असे एक ना अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांना विचारले आहेत. छोट्या छोट्या प्रकरणावर व्यक्त होणारे गृहमंत्री अनिल देशमुख पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर का बोलत नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘गरज सरो, पटेल मरो’ स्टेडियमच्या नामांतरावरुन भाजपवर शिवसेनेची टीका


अधिवेशनापासून सरकारचा पळ

आगामी विधानसभा अधिवेशनापासून सरकार पळ काढत आहे. कोरोना परिस्थितीचा फायदा घेत राज्य सरकार अधिवेशनात विचारल्या जाणाऱ्या जनतेच्या आणि विरोधकांच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न आहेत. जनतेच्या वीज बिलांचे प्रश्नांवर उत्तरे देण्यापासून राज्य सरकार पळ काढत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -