पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर आम्ही…

Devendra Fadnavis criticizes NCP

पुण्यातील भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांवर हात उचलल्याच्या प्रकणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप- प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या मुद्यावरून आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यांच्यावर निशाना साधला होता. याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणे, आमच्या नेत्यांवर अंडी, टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे. आपले राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत, या तोऱ्यामध्ये होत आहे. आम्ही लोकशाही मानतो त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही. असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

यावर गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असे ट्वीट रोहीत पवारांनी केले आहे.

सुप्रिया सुळेंना उत्तर –
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया ताईंनी सगळ्याच बाबतीत अशा प्रकरे निर्णय घेतला पाहिजे. कारण यापूर्वी नवनीत राणांसोबत जे झाले, त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत. अनेक महिलांवर अशा प्रकारे हल्ले झाले त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत. आमच्या पक्षाच्या महिलांना मध्यतरी पोलीसांनी अतीशय वाईट पद्धतीची वागणूक दिली त्यावेस त्या बोलल्या नाहीत, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

संभाजी राजेंवर काय म्हणाले –
मला त्याबद्दल काही माहीत नाही. शिवसेना हा वेगळा पक्ष आहे. त्यांचे काय करायचे ते ठरवतील. सभाजी राजे स्वत: सक्षम आहेत. त्यांचा निर्णय ते घेतील. त्यामुळे या सदर्भात बोलन्याचे कारणार नाही.