संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे ! – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray and Mahavikas Aghadi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला असून ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, असे सांगत ठाकरे यांनी भाजपच्या सर्वच नेत्यांवर निशाना साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्व वादावर ही आसूड ओढले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी एक कवीता ट्विट करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाना साधला आहे.

बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?, असे प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विट करत उपस्थित केले आहेत.

त्यांनी दूसऱ्या ट्विटमध्ये असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे ! असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.