Eco friendly bappa Competition
घर ट्रेंडिंग देवेंद्र फडणवीस New Look मुळे चर्चेत, कधीकाळी केलं होतं मॉडलिंग

देवेंद्र फडणवीस New Look मुळे चर्चेत, कधीकाळी केलं होतं मॉडलिंग

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नेहमीच्या पेहरावापेक्षा वेगळ्या पोषाखात होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी कधीकाळी मॉडलिंग केलं होतं यावर कोणाचा आता विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. आज फडणवीसांच्या मॉडलिंगची चर्चा होत आहे, कारण उपमुख्यमंत्रींनी आज त्यांच्या नेहमीच्या पेहरावापेक्षा वेगळा ड्रेसअप केला होता. देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहेत.

Amruta fadnavis

- Advertisement -

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस या त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असतात. अमृता फडणवीस या मुळात बँकर आहेत. गायन हा त्यांचा छंद आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता गायिका म्हणून नावारुपाला आल्या. त्यांचा म्यूझिक अल्बम देखील आलेला आहे. त्यासोबतच त्या हेल्थ कॉन्शेअस देखील आहेत. अमृता फडणवीस यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जीम आणि योगा ट्रेनरकडून व्यायामाचेही धडे घेतले आहेत. अमृता फडणवीस यांनी रॅम्पवॉक देखील केलेला आहे. त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे नेहमी शर्ट, पँट आणि जॅकेट या रेग्यूलर पेहरावात सर्वत्र दिसतात. मात्र बुधवारी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नवीन लूकमुळे चर्चेत आले आहेत.

नवी मुंबई विमानतळ पाहणी करीता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत
नवी मुंबई विमानतळ पाहणी करीता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत

- Advertisement -

हेही वाचा : पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या अमृता फडणवीस तुफान ट्रोल; नेटकरी म्हणाले….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नेहमीच्या पेहरावापेक्षा वेगळ्या पोषाखात होते. फडणवीसांनी पांढरा नेहरु कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता आणि नेहमीप्रमाणे त्यावर त्यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. शर्ट, पँट आणि जॅकेट हा तसा फडणवीसांचा नेहमीचा पेहराव असतो. मात्र नवी मुंबई विमानतळ पाहणीसाठी आलेले फडणवीस ‘बदले-बदले से’ दिसत होते.

देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील एका गारमेंट्स स्टोअरसाठी मॉडलिंग
देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील एका गारमेंट्स स्टोअरसाठी मॉडलिंग

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द ही नागपुरमधून नगरसेवकाच्या रुपाने झाली आहे. ते सर्वात तरुण महापौर होते. २००६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बालमित्र आणि फोटोग्राफर विवेक रानडे यांच्या आग्रहाखातर नागपूरमधील एका गारमेंट्स स्टोअरसाठी मॉडलिंग केले होते. तेव्हा पश्चिम नागपूर शहरात त्यांचे वेगवेगळ्या पोज आणि शर्टमधील होर्डिंग्ज झळकले होते. तेव्हा फडणवीसांचे वय ३६ वर्षे होते. मात्र हे त्यांचे पहिले आणि शेवटचे मॉडलिंग राहिले. यानंतर त्यांनी राजकारणावरच फोकस केला आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा कधीही मॉडलिंग केले नाही.

हेही वाचा : अमृता फडणवीस यांचं ‘अज मैं मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित; अल्पावधीत गाण्याला लाखो व्ह्यूज

Amruta Fadnavis Birthday
Amruta Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी मॉडलिंगसाठी वजन कमी केले होते. आता त्यांना त्यांच्या वजनावरुन अनेकदा ट्रोलही केले गेले आहे. विरोधकांनीही त्यांच्या वजनावरुन निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना गेल्यावर्षी बाबरी ढाचा नेमका कोणी पाडला, यावरुन भाजप आणि ठाकरे गटात खडाजंगी झाली. तेव्हा “देवेंद्र फडणवीस बाबरीच्या ढाच्यावर चढले असते तरी ढाचा पडला असता”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या वजनावरुन त्यांची खिल्ली उडवली होती. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास आहे. माझं वजन 102 आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. सामान्य माणसाचा एफएसआय 1 असेल तर माझा एफएसआय 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही.”

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -