Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईDevendra Fadnavis : देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Devendra Fadnavis : देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) चार अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. याप्रकरणी आता गृहमंत्री आणि भाजपा नेते यांनी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याची खिल्ली उडवली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) चार अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधक भाजपा आणि महायुतीवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अनिल देशमुख यांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. याप्रकरणी आता गृहमंत्री आणि भाजपा नेते यांनी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याची खिल्ली उडवली आहे. (Devendra Fadnavis mocks the attack on Anil Deshmukh)

सोमवारी रात्री उशीरा गाडीवर दगडफेक झाल्यानंतर अनिल देशमुख जखमी झाले होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना काटोल ग्रामीण रुग्णायलयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून आणि तपासणी करून डॉक्टरांनी अनिल देशमुख यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात पाठवले. यानंतर आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट भाजपावर हल्लाबोल केला. अनिल देशमुख म्हणाले की, भाजपाला मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यावर दगड मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही आणि सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही, असा  इशारा त्यांनी दिला. याप्रकरणी आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्वी हिंदी चित्रपटामध्ये सलीम जावेद यांच्या स्टोरी या अतिशय लोकप्रिय होत्या. तशाच स्टोरीज अनिल देशमुख यांनी सांगण्यास सुरू केल्या आहेत. या अगोदर त्यांनी पुस्तक काढलं होतं. आता ते हल्ला झाल्याचं सांगत आहेत. मात्र आज पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिलेली आहे. त्या पत्रकार परिषदेत काय घडलंय ते सगळं स्पष्ट झालं आहे. 10 किलोचा दगड कारच्या पुढील बाजूस मारला, तरी त्या कारची काच तुटली का नाही? 10 किलोचा दगड बोनेटवर पडला तरी त्याला स्क्रॅच सुद्धा आला नाही. याशिवाय एकच दगड देशमुखांच्या कारमध्ये दिसतो आहे. तो दगड मागील बाजूने मारलेला दिसतो आहे. मात्र मागील बाजूने मारलेला असेल मागच्या काचेला लागायला पाहिजे होता. पण तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड रजनीकांतच्या सिनेमात फेकला जाऊ शकतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -