घरमुंबईDevendra Fadnavis : निखिल वागळे कितीही चुकीचे बोलले तरी...; पुणे हल्लाप्रकरणी फडणवीसांचे...

Devendra Fadnavis : निखिल वागळे कितीही चुकीचे बोलले तरी…; पुणे हल्लाप्रकरणी फडणवीसांचे भाष्य

Subscribe

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निखिल वागळे हे आज ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी संध्याकाळच्या वेळेला निर्भया बनो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवरही हल्ला केला. याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निखिल वागळे याचं नाव न घेता म्हटले की, ते कितीही चुकीचे बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसाचं काम आहे आणि पोलीस ते चोख करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis No matter how wrong Nikhil Wagle says maintaining law and order is the job of the police Pune attack case)

हेही वाचा – Nikhil Wagle : पुण्यात निखिल वागळेंची गाडी फोडली! निर्भय बनो कार्यक्रमाला भाजपाचा विरोध

- Advertisement -

निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केलेले भाजपाचे कार्यकर्ते आहेत, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये. मग भाजपाचा असो किंवा कोणीही असो, जो कायदा हातात घेईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशाप्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. निखिल वागळे याचं नाव न घेता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते कितीही चुकीचे बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसाचं काम आहे आणि पोलीस ते चोख करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेनेने केली असून प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रही लिहिलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की, वाझे लादेन आहेत का? अशा प्रकारचं ज्यावेळेला वक्तव्य झालं, अॅटेलियाजवळ जेव्हा बॉम्ब ठेवण्यात आला किंवा त्यांच्या सरकारचा गृहमंत्री हा 100 कोटी रुपयांची लाच मागितली म्हणून जेलमध्ये गेला, त्यावेळी पत्र लिहायला पाहिजे होतं. पण मला असं वाटतं की, हे सर्व राजकारणासाठी चाललेलं आहे आणि मला अतिशय निराश असा विरोधी पक्ष दिसतो आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकराच्या मागण्या होत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Nikhil Wagle : भेकड सरकारकडून आता पोलिसांचा वापर सुरू; पुण्यातील घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक

पुण्यात निखिल वागळेंवर गुन्हा दाखल

निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर ‘एका दंगेखोराने दुसर्‍या दंगेखोराला दिलेला पुरस्कार’ अशा स्वरूपाचे लिखाण केले होते. याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचे देवधर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पुणे पोलिसांना काय म्हटले?

निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितले की, आज याठिकाणी कार्यक्रम होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सहा वाजता कार्यक्रम सुरूही झाला. मात्र निखिल वागळे याठिकाणी येणार असल्यामुळे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध केला होता. त्यामुळे आम्ही निखिल वागळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुरक्षा पुरवली. ते कार्यक्रमस्थळी येत असताना त्यांच्या गाडीच्या मागे पुढे पोलीस होते, पण ट्रॅफिकमध्ये काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाही आणि दगड फेकले. ज्या ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे, त्याठिकाणचे आम्ही सीसीटीव्ही फुजेट तपासू आणि हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करू, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -