घरCORONA UPDATEसरकार आपलं, मग अपयश आयुक्तांच्या माथी का मारताय? - फडणवीस

सरकार आपलं, मग अपयश आयुक्तांच्या माथी का मारताय? – फडणवीस

Subscribe

ठाणे जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व ६ महानगर पालिकांमधल्या आयुक्तांच्या बदल्या केल्या. मात्र, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. फडणवीसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीसोबतच आयुक्तांच्या बदल्यांवर देखील निशाणा साधला आहे. ‘आयुक्तांच्या बदल्या करणं हे चांगलं धोरण नाही. कुणी खूपच अकार्यक्षम असेल, तर बदली होणं समजू शकतो. पण सातत्याने बदल्या होणं चुकीचं आहे. आयुक्त पदावरची व्यक्ती वारंवार बदलली, तर कन्सिस्टन्सी संपून जाते. सरकार आपल्या अपयशाचं खापर आयुक्तांच्या माथी मारून आपला बचाव करतंय का, याचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे’, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी कोरोनावरच्या उपाययोजनांमध्ये राज्य सरकार कुठे कमी पडत आहे, त्यावर देखील बोट ठेवलं. ‘नवी मुंबईत थर्मल टेस्टिंग वाढवणं गरजेचं आहे. आत्ताच्या परिस्थितीत वाढणारी रुग्णसंख्या आणि आवश्यक उपाययोजना यांचं गणित जुळत नाहीये. रुग्णसंख्या वाढीच्या दरानुसार आयसीयूचे अधिक बेड उपलब्ध असणं गरजेचं आहे. शासनानं कोरोनाच्या टेस्टिंगची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत आत्ता होत आहेत त्यापेक्षा किमान दुप्पट टेस्टिंग करणं गरजेचं आहे. राज्यात कोरोना संक्रमणाचा दर ३० ते ३८ टक्क्यांपर्यंत आहे. त्याशिवाय आत्ता व्हेंटिलेटर्सची देखील गरज आहे. मात्र, सरकार मंदगतीनं व्हेंटिलेटर्सची खरेदी करत आहे. सध्या शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावं लागत आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -