घरमुंबई#IndiaTogetherवर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले..

#IndiaTogetherवर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले..

Subscribe

भारत एकजूट आहे आणि हीच एकत्रितपणे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली

केंद्राने आणलेल्या नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. गेले ७० दिवसांहून अधिक दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन चिघळताना दिसत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर देशातील राजकीय पक्षांनी आणि राजकारण्यांनी तसचे देशातील जनतेने पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर विविध पोस्ट करत आहेत. परदेशी पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. तिच्या समर्थनाला देशातील सेलिब्रिटींनी आणि खेळाडूंनी इंडिया टु गेदर असे हॅशटॅग वापरुन समर्थनाला विरोध केला आहे. याच ट्विटवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कोणताही प्रचार आमची ऐक्य, आपली प्रगती नवीन भारत बनविण्याच्या आपला जलद प्रवास खराब करू शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही. भारत एकजूट आहे आणि हीच एकत्रितपणे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे, जी आपल्या भारतीयांच्या रक्तात आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान केंद्र सरकारने आणलेले तीन नवे कृषी कायदे हे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी आंदोलकांशी वारंवार चर्चा केली जाते. लवकरच केंद्र सरकार यावर तोडगा काढेल. कृषी कायद्यांविरोधात राजकारण केले जात आहे. शेतकरी आंदोलकांमध्ये काही शेतकरी बोगस असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -