घरCORONA UPDATEचांगली कामे करणारे भाजपमध्येच, शिवसेनेला विश्वास - फडणवीस

चांगली कामे करणारे भाजपमध्येच, शिवसेनेला विश्वास – फडणवीस

Subscribe

जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. असं फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अभिनेता सोनू सूद याच्यावर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, चांगली कामे करणारे भाजपामध्येच आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो आहे असा टोला त्यांनी लगावला. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी भाजपाकडून ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोणीही चांगले काम केले तर त्या कामाचे कौतुक झाले पाहिजे. सोनू सूद यांनी चांगले काम केल्याबरोबर ते भाजपाचे आहेत, असे सांगितले गेले. शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की, चांगलं काम करणारे हे भाजपामध्येच आहेत. आम्हाला याचा आनंद आहे आणि त्यांचा आभारी आहे. पण सोनू सूद यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर एक चांगले समजाकार्य केले आहे. त्या कामाचे कौतुक झाले पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले दरम्यान  आम्ही जेव्हा जलायुक्त शिवारचे काम करायचो तेव्हा नाम संस्था आणि आमीर खान मदत करायचे. आम्ही हेवादावा केला नाही. ते सरकारला मदतच करत होते. त्यांचे आम्ही कौतुकच केले. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा बाबतीत राजकारण करणे हे चुकीचे असल्याचे फडणवीस यावेळी म्हणालेत.

कोकणच्या मदतीला भाजपा 

दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत 14 ट्रक मदतसामुग्री मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज पहिल्या टप्प्यात 14 ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवार्‍याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘या’ राज्यात कोरोना रूग्ण ४२, तरीही पुन्हा लॉकडाऊन वाढवला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -