अन् महाडिकांना विधान परिषदेच्या पायऱ्यांवरचं मारली लेकाने आनंदाने घट्ट मिठी

dhananjay mahadik and his son emotional steps of vidhan sabha after won in rajya sabha election 2022

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. या सहाव्या जागेसाठी शिवसेने संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. मात्र या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच चुरस रंगली, पण भाजपच्या धनंजय महाडिकांनी विजय मिळवला. या विजयामुळे महाडिक कुटुंबाची पराभवाची मालिका संपुष्टात आली आहे, धनंजय महाडिकांनी 41.56 मतांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विजयी उमेदवार आणि पक्षातील नेते विधानसभेच्या पायऱ्यांवर एकत्र जमा झाले, यावेळी धनंजय महाडीक यांच्या विजयामुळे त्यांच्या लेकाला भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवरील भाजप नेत्यांना महाडिक बाप लेकाचा एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.

धनंजय महाडिकांचा विजय होताच लेकाने विधानसभेच्या पायऱ्यांच्या दिशेने धाव घेत बापला घट्ट मिठी मारली. यावेळी महाडिकांच्या लेकाला आनंदाश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाडिकांनी अश्रू ढाळणाऱ्या लेकाची गोड समजूत घातली, बाप लेकाची ही गळाभेट उपस्थितांना खरचं भावूक करणारी होती.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक यांनी, “फडणवीस यांच्या रणनितीने आम्ही निवडणुकीत जिंकलो,” असल्याची प्रतिक्रिया दिली. (राज्यसभा निवडणूक 2022)

तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती यशस्वी ठरल्याची चर्चा सुरु आहे. धनंजय महाडिकांच्या विजयावर प्रतिक्रिया देत फडणीस म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानचं भेट दिला.

राज्यसभेतील विजयी उमेदवार

संजय राऊत – शिवसेना- 42

प्रफुल पटेल – राष्ट्रवादी काँग्रेस- 43

इम्रान प्रतापगडी – काँग्रेस- 44

पियुष गोयल -भाजप- 48

अनिल बोंडे – भाजप- 48

सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?

  1. धनंजय महाडिक – भाजप – 41 (विजयी)
  2. संजय पवार- शिवसेना – 33 (पराभूत)

फडणवीसचं भाजपच्या विजयाचे किंग ; उद्धव ठाकरे – शरद पवार यांना दिला धोबीपछाड