घरमुंबईराज्य सरकार म्हणजे आंधळा चौकीदार - धनंजय मुंडे

राज्य सरकार म्हणजे आंधळा चौकीदार – धनंजय मुंडे

Subscribe

राज्यपालांनी अधिवेशनादरम्यान केलेल्या अभिभाषणावर धनंजय मुंडेंनी टीका केली आहे.

‘राज्यपालांचे अभिभाषण पाहून राज्यात ऑल इज वेल वाटेल. परंतु राज्यात काहीच ऑल इज वेल नाही, तर नथिंग इज वेल आहे. राज्य सरकार म्हणजे आंधळा चौकीदार’, असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ‘राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकाराला वाटते हा ‘शोले’ चित्रपट आहे . परंतु गेल्या साडेचार वर्षांत राज्याची परिस्थिती बघता हा कारभार ‘रामगड के शोले’ च्या दर्जाचा नाही, उलट तो ‘रामगोपाल वर्मा की आग’ या दर्जाचा होता असा उपरोधिक टोला लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणात जुन्याच योजनांची आणि पूर्ण न झालेल्या घोषणांची लांबलचक यादी दिलेली आहे. त्यात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीचे कोणतेही दिशादर्शन झालेलं नाही’, असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

विखे पाटलांना दिलं आव्हान

‘ऑल इज वेल आणि भाजपाचे अच्छे दिन केवळ राज्याच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांना आले आहेत. विखे पाटील यांनी आता प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करून दाखवावी’, असे आव्हानही धनंजय मुंडे यांनी नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि गृहनिर्माण मंत्री पदावर वर्णी लागलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना दिले.

- Advertisement -

धनंजय मुंडेंचा हा व्हिडिओ पाहिलात का? – दीड डझन मंत्र्यांना वगळा

भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करणार का?

‘विखे पाटील यांनी केलेल्या मुंबईच्या डीपीतील १ लाख कोटी रुपये घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केले म्हणून त्यांच्यासोबत मंत्रिपदाची डील झाली आहे का?’ असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. ‘मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या माजी मंत्र्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार?’ असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -