घरमुंबईइंग्रजांनी वसवलेल्या धारावीची कहाणी

इंग्रजांनी वसवलेल्या धारावीची कहाणी

Subscribe

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजांनी वसवलेल्या धारावीचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजांनी वसवलेल्या धारावीचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी मोठी वसाहत म्हणून धारावीची जगभरात ओळख आहे. ५५० एकरात विस्तारलेल्या या धारावीच्या एक किमी परिसरात २ लाखाहून अधिक लोक दाटीवाटीने गुण्यागोविंदाने राहत आहेत. तसेच याच धारावीत दरवर्षी ८० अब्ज डॉलरची उलाढाल होते. यामुळेच धारावीबदद्ल देशातीलच नाही तर परदेशातही कुतुहूल आहे.

- Advertisement -

धारावी ही माथाडी कामगार, मजुर याबरोबरच स्थलांतरितांची भलीमोठी वस्ती असून कमी पैशात येथे राहता येते. यामुळे नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेकजणांना ही धारावी वर्षानुवर्ष आधार देत आहे. यामुळे धारावीला छोटा इंडीया असेही म्हणतात. म्हणून मुंबईतच नाही तर देशातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद धारावीच्या झोपडपट्टीत उमटतात. आजच्या घडीला अंदाजे धारावीची लोकसंख्या ६ ते १० लाखाच्या घरात आहे. टोलेजंग इमारतींनी वेढलेल्या या वस्तीत अनेक लहान मोठे उद्योग चालतात. येथील बहुतेक कुटुंब घरातूनच व्यवसाय चालवतात. यात गारमेंट ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कच्च्या मालापासून ते ब्राडेंड उत्पादनांवर काम केले जाते. तसेच अनेक लहान मोठे विविध क्षेत्राशी संबंधित व्यवसाय येथे अनेकजण पिढ्यापिढ्या करत आहेत.

- Advertisement -

यात अगदी खाद्य व्यवसायापासून पादत्राणांचीही निर्मिती केले जाते. धारावीत आज कमीत कमी ५८ हजार कुटुंब राहत असून १२ हजार व्यावसाय़िक कॉमप्लेक्स आहेत. बाहेरून बघितल्यावर एवढ्या गजबजलेल्या दाटीवाटीने उभ्या राहीलेल्या या वसाहतीमध्ये एवढी मोठी व्यावसायिक उलाढाल चालते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. यामुळेच भारत फिरायला आलेले पर्यंटक धारावीला आवर्जून भेट देतात. कुंभार वाडा, चामड्याच्या वस्तू, दागिण्याचे कारखाने या वस्तीमध्ये असून देशातच नाही तर परेदशातही येथून माल जातो. तब्बल २२ हजाराहून जास्त लहानमोठे व्यवसाय येथे स्थिरावले आहेत. येथील रिसायक्लिंग व्यवसायाने तब्बल २.५० लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळवून दिला आहे. यात महिला आणि लहानमुलांचाही समावेश आहे. धारावीच्या इंचभर जागेतही व्यवसाय आहे.

घनदाट लोकसंख्या आणि नागमोडे गल्लीबोळ असलेल्या या धारावीच्या वस्तीत जर कोणी गेला तर तो त्याच रस्त्याने परत येईल याची शाश्वती नसते. कारण ही गल्लीबोळं म्हणजे भूलभुलैय्या आहे. नवखी लोक येथे हरवून जातात. यामुळे धारावीत जायला धाडसच नाही तर हिंमत आणि कॉन्टेक्ट लागतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या या वसाहतीला सोयीसुविधा पुरवण्याचे काम हे बीएमसी समोर एक आवाहनच असते. कारण येथे दिवसागणिक वाढणारा माणसांचा आकडा. यामुळे कितीही सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी धारावी गलिच्छच वाटते. त्यातच येथे असलेल्या झोपडपट्टी दादांचाही येथील जनतेवर वचक आहे. लहान मोठे गुन्हे येथे नित्याचेच यामुळे क्राईम स्टोरीसाठी धारावीला बॉलीवूडकरांची नेहमीच प्राधान्य असते. यास हॉलीवूडही अपवाद नाही.

एकेकाळी भुरटे चोर असलेले आज या वस्तीमध्ये दादा म्हणून वावरत आहेत. यातील अनेकांच्या नावावर चित्रपट आणि वेबसीरिजही बनत आहेत. २००८ साली सुपरडुपर हीट झालेल्या स्लमडॉग मिलिनियरचे शूटींगही याच धारावीच्या गल्ली बोळात झाले होते. त्यामुळे हॉलीवूडच्या पडद्यावरही धारावी झळकली.

याच धारावीत कोरोनाचा उद्रेक झाला. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहीला रुग्ण याच वस्तीत सापडला. त्यानंतर येथे कोरोनाचा विस्फोट झाला. संपूर्ण देशाचेच नाही तर जगाचे लक्ष त्यावेळी भारत आणि धारावी कडे होते. एवढी दाट लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखणे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे टास्क होते. सार्वजनिक शौचालये दाटीवाटीच्या वसत्यांमुळे वाढणारा संसर्ग ही त्यामागची कारणे होती. पण मुंबई महानगपालिकेने हे आव्हान स्विकारत जो धारावी पॅटर्न वापरला आणि कोरोना नियंत्रणात आणला त्याचं जगभरात कौतुक झालं. मात्र पुर्नविकास झाल्यानंतर हे चित्र नक्कीच बदलेल. कदाचित मुंबईतील ही गलिच्छ वस्ती पाहण्यासाठी नाही तर त्या जागी उभी राहीलेली टोलेजंग धारावी पाहण्यासाठी पर्यंटक नक्कीच गर्दी करतील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -