घरताज्या घडामोडीधक्कादायक! धारावीत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

धक्कादायक! धारावीत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

Subscribe

धारावीतील ५६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या धारावीतील शाहू नगरमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज संध्याकाळी सायन रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाला २३ मार्चपासून सतत सर्दी, कफ आणि ताप येत होता. त्यामुळे २६ मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णाचा आज कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय रुग्ण राहत असलेल्या इमारतीला देखील आता सील करण्यात आले आहे. दरम्यान, हा रुग्ण परदेशातून आला नव्हता. तरी देखील या रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या रुग्णाचे धारावीतील परिसरात कपड्याचे दुकान असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली याचा सध्या शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कदायक! चेंबूरमध्ये तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -