Petrol Diesel Price: पेट्रोल नंतर डिझेलच्या किंमतीही शंभरीपार, जाणून घ्या आजचे दर

मुंबईत डिझेलच्या किंमतींनी १०० ओलांडली

Diesel Price hike 35 paisa hike
Petrol Diesel Price: पेट्रोल नंतर डिझेलच्या किंमतीही शंभरीपार, जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत कच्चा तेलांच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आज देशात सलग पाचव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या होत्या. आता पेट्रोलनंतर डिझेलच्या किंमतींनी देखील सेन्चुरी मारली आहे. मुंबईत एक लिटर डिझेलसाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत आज पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ झाली आहे. तर मुंबईत डिझेलच्या किंमतींनी १०० ओलांडली आहे. देशातील प्रमुख शहारातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

मुंबई

पेट्रोल – १०९.८३ रुपये प्रति लीटर
डिझेल – १००.२९ रुपये प्रति लीटर

दिल्ली

पेट्रोल – १०३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.४७ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०१.२७ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६.९३ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.५७ रुपये प्रति लीटर

मिळालेल्या माहितीनुसार,आंतराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कच्चा तेलांच्या किंमती वाढत आहेत. कच्चा तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेकची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळाच इंधनांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.


हेही वाचा – Cruise drug bust : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी NCB चा छापा