घरमुंबईराज्य सरकार, राज्यपालांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत

राज्य सरकार, राज्यपालांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत

Subscribe

राज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, हीच समाधानाची बाब आहे. राज्यपाल आणि सरकार मतभेद असू शकतात. यापूर्वी सुद्धा झाले आहे, असे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सांगितले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्यात आजही कोरोनाची गंभीर स्थिती आहे. परंतु, ज्या पद्धतीने राज्यात कोरोनाचे संकट हाताळले जात आहे ते अतिशय गंभीर आहे.आधीही सातत्याने कमी चाचण्या केल्याने महाराष्ट्रात कोरोना वाढला. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात महाविकास आघाडी सरकारचे अपयश स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोना नीट हाताळला असता तर ९ लाख ५५ हजार रुग्णांची संख्या कमी झाली असती. आणि ३० हजार ९०० मृत्यू कमी झाले असते.आता ही जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह देणारे रॅकेट असल्याचा आरोप केला. नवी मुंबईत ७ हजार ८०० पॉझिटिव्ह अहवाल विनाचाचण्यांचे आल्याचा दावा करीत कोरोनाच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

धार्मिक स्थळांमुळे कोरोना वाढतो का
हे वर्ष संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. परंतु त्यासाठी सरकारचे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही. शिवजयंती आणि मंदिरे व धार्मिक स्थळांमुळेच कोरोना वाढतो का, असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -