केंद्रीय यंत्रणांसंदर्भातील आशिष शेलारांनी केलेली ‘ती’ मागणी गृहमंत्र्यांनी केली मान्य

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केला. आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे ही शंका निर्माण झाली असून या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळले तर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सौरभ त्रिपाठी हे आयकर अधिकारी असल्याचे भासवून आंगडीया आणि व्यापा-याकडून वसूली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांचे निलंबन केले आहे. या कारवाईचे स्वागत करताना शेलार यांनी आज एका गंभीर बाबीकडे सरकारचे लक्ष वेधले.

या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आशीष शेलार यांनी केली.


मास्क घालण्याचा कंटाळा करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची