घरमुंबईसोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराची पोलिसांना मदत, गटारातून काढले १० तोळे सोने

सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराची पोलिसांना मदत, गटारातून काढले १० तोळे सोने

Subscribe

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल (45) या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी जात होत्या. वाटेत त्यांना एक भिकारी स्त्री आणि तिचे मूल दिसले. सुंदरीने पिशवीत ठेवलेला वडापाव त्यांना दिला आणि ती निघून गेली.

मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi police) एका गटारातून (gutter) 10 तोळे सोने (gold) शोधून काढले आहे. सोन्याने भरलेली पिशवी कोरडा पाव समजून एका भिकाऱ्याने (beggar) ती कचऱ्यात फेकून दिली. या पिशवीत ५ लाखांचे दागिने होते. सीसीटीव्हीच्या मदतीने दिंडोशी पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सोन्याने भरलेली दागिन्यांची पिशवी शोधून ती महिलेच्या ताब्यात दिली आहे. मात्र, हे दागिने शोधण्यासाठी पोलिसांना एका उंदराची (rat) मदत झाली. उंदरामुळे पोलिसांना या दागिन्यांच्या पिशवीपर्यंत जाता आले.

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सुंदरी प्लानिबेल (45) या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी जात होत्या. वाटेत त्यांना एक भिकारी स्त्री आणि तिचे मूल दिसले. सुंदरीने पिशवीत ठेवलेला वडापाव त्यांना दिला आणि ती निघून गेली. सुंदरी बँकेत पोहोचल्यावर तिने भिकारी स्त्रीला दिलेल्या वडापावच्या पिशवीत सोन्याचे दागिनेही ठेवल्याचे समजले. सुंदरी ताबडतोब बँकेतून बाहेर पडली आणि तिने त्या भिकारी स्त्रीला वडापाव दिला होता त्या ठिकाणी गेली. मात्र ती तेथे न आढळल्याने सुंदरीने दिंडोशी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ या भिकारी महिलेचा तपास सुरू केला.

- Advertisement -

दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एपीआय चंद्रकांत घार्गे आणि एपीआय सूरज राऊत यांच्या पथकाने त्या ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, तेथून ही भिकारी स्त्री गोरेगाव मोतीलाल नगर येथे गेल्याचे दिसले. पोलिसांनी तिच्याशी  संपर्क साधला असता वडापाव कोरडा असून तो कचऱ्यात फेकून दिल्याचे तिने सांगितले. दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ एपीआय सुरज राऊत, पोलिस हेडकॉन्स्टेबल शंकर माईंगडे, हेमंत रोडे, पोलिस नाईक सचिन कांबळे, पोलिस शिपाई विलास जाधव, सचिन पोटे यांच्या पथकाने कचऱ्यातील पिशवीचा शोध सुरू केला.  पण पिशवी सापडली नाही.

त्यानंतर पोलिसांनी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिस ज्या कचऱ्याची पिशवी शोधत आहेत ती उंदराच्या ताब्यात असल्याचे आढळून आले. पिशवी घेऊन उंदीर इकडे तिकडे फिरत होता. पाव खाण्यासाठी पिशवीत घुसल्यानंतर उंदीर इकडे तिकडे धावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. पोलिसांनी उंदराचा पाठलाग केला. तोपर्यंत उंदीर त्या पिशवीसह जवळच्या गटारात घुसला. पोलिसांनी गटाराच्या आत शोधाशोध करून सोन्याचे दागिने सापडलेली पिशवी बाहेर काढली. त्यानंतर दागिन्यांची पिशवी पोलीस स्टेशनमध्ये आणून सुंदरीकडे सोपवली.

- Advertisement -

सोने मिळाल्यानंतर सुंदरीने पोलिसांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, मला खात्री होती की सोने नक्कीच सापडेल. कारण मुंबई पोलिस हे देशातील सर्वोत्तम पोलिस आहेत. दिंडोशी पोलिसांना 1000 वेळा धन्यवाद म्हटले तरी कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -