घरमुंबईRTPCR चाचणी अहवाल यापुढे मिळणार Whatsapp वर, उच्च न्यायालयाचा प्रयोगशाळांना आदेश

RTPCR चाचणी अहवाल यापुढे मिळणार Whatsapp वर, उच्च न्यायालयाचा प्रयोगशाळांना आदेश

Subscribe

तसेच पॉझिटिव्ह रुग्णांचा चाचणी अहवाल २४ तासात आत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर अपलोड करावा, असेही आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सर्व प्रयोगशाळांना दिले आहेत.

एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही शोधून काढण्यासाठी आरटीरपीसीआर चाचणी आवश्यक असते. परंतु RTPCR चाचणी अहवाल यापुढे Whatsapp वर मिळणार आहे. कारण उच्च न्यायालयाचा प्रयोगशाळांना आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची सॉफ्ट कॉपी संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपर क्रमांकावर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांचा चाचणी अहवाल २४ तासांचा आत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर अपलोड करावा, असेही आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सर्व प्रयोगशाळांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यासाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांना तीन ते चार दिवस अहवालाची वाट पाहावी लागते आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून एक याचिका दाखल करुन घेतली होती. या जनहित याचिकेत शहरातील चिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांनी मध्यस्थी अर्ज केला असून यावर न्या. झका हक आणि न्या. अमित बोरकर यांच्या‌ समक्ष सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने विषयाची गांभीर्यता लक्षात घेत चोवीस तासांच्या आत चाचणी अहवाल आयसीएमआरच्या पोर्टलवर अपलोड करून त्याची सॉफ्ट कॉपी संबंधित व्यक्तीला Whatsapp करा, तसेच लवकरात लवकर हार्डकॉपी उपलब्ध करुन द्यावी असा आदेश उच्च न्यायालयाने प्रयोगशाळांना दिला आहे. मध्यस्थी अर्जदारातर्फे अॅड. राहील मिर्झा यांनी बाजू मांडली.

- Advertisement -

सरकारी नियमानुसार, कोरोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही रुग्णांचा चाचणी अहवाल आयसीएमआरच्या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तो अहवाल संबंधित व्यक्तीला देण्यात येतो. परंतु अनेकदा सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी्ंमुळे अहवाल अपलोड करण्यात वेळ खर्ची होतो. परिणामी रुग्णाला अहवाल मिळवण्यासाठी तीन ते चार दिवस जातात. य़ादरम्यान स्वॅबचे नमुने दिलेल्या व्यक्ती सर्वत्र फिरत राहतात. समजाच तो व्यक्ती पॉझिटिव्ह असेल परंतु रिपोर्ट येण्यास वेळ लागत असल्याने नकळत इतरांनाही संक्रमित करतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये चाचणी अहवाल लवकरात लवकर मिळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -