राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आजच कारवाई, राज्यात ३० हजार पोलीस तैनात, पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया

Director General of Police rajnish seth said Action taken today regarding Raj Thackeray speech thousands police deployed in the state
राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आजच कारवाई, राज्यात ३० हजार पोलीस तैनात, पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणाबाबत आजच कारवाई करण्यात येईल. औरंगाबाद पोलीस आयुक्त सभेबाबत कारवाई करतील. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडल्यास पोलीस कारवाई करतील अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यात एकूण १५ हजार जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर ८७ एसआरपीएफच्या तुकड्या तसेच ३० हजार होमगार्ड संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले आहे.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णय़ांची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या सभेबद्दल कारवाई करतील. ते त्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. जे भाषणाबाबत पडताळणी सुरु आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त कारवाई करण्यास सक्षम आहेत.

ईद व अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत राज्याचे पोलीस महासंचालक यांनी महाराष्ट्रातील तयारीची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आढावा घेतला. महाराष्ट्र पोलीस कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे. राज्यातील सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. जी काही कारवाई करावी लागणार ती करण्यात येणार आहे. समाजकंठक आणि गुन्हेगार यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक एकोपा राखण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबाजवणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आली असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले आहे.

राज्यात कोणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. ८७ एसआरपीएफ कंपनी आणि ३० हजारच्या वर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कोणलाही बिघडवू देऊ नये असे स्पष्ट पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

१५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. १५ हजार नोटीस तर १४९ ची नोटीस १३ हजारच्या वरती जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये यासाठी कारवाई करत आहे. कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली तर कठोर कारवाई करण्यात येईल. ईद शांततेत पार पडली आहे. त्या अनुषंगाने आमची संपूर्ण तयारी सुरु आहे. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. होमगार्ड राज्यात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.


हेही वाचा : संजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा