घरताज्या घडामोडीमुंबई जीएसटी घोटाळा : 16 विमा कंपन्यांचा तब्बल 824 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

मुंबई जीएसटी घोटाळा : 16 विमा कंपन्यांचा तब्बल 824 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

Subscribe

मुंबई विभागातील 15 विमा कंपन्यांनी जीएसटी घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 824 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा केला आहे. या जीएसटी घोटाळ्यात काही मार्केटिंग कंपन्यांचा हात असल्याचंही DGGIने म्हटलं आहे.

मुंबई विभागातील 16 विमा कंपन्यांनी जीएसटी घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 824 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा केला आहे. या जीएसटी घोटाळ्यात काही मार्केटिंग कंपन्यांचा हात असल्याचंही DGGIने म्हटलं आहे. याबाबत जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने माहिती दिली आहे. (Directorate General of GST Intelligence Mumbai Zonal Unit detects GST fraud worth to the tune of Rs 824 crore by 16 insurance companies)

तब्बल 824 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळ्याचा जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने केलेल्या तपासात याचा पर्दाफाश झाला आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या माहितीनुसार, विमा कंपन्या, मार्केटिंग कंपन्या तसेच अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून 824 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी चोरी केली आहे.

- Advertisement -

या कंपन्यांनी वस्तू आणि सेवा न देताच इनपूट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC चा लाभ घेतल्याचा आरोप आहे. पण याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरु आहे. या जीएसटी घोटाळ्यात काही मार्केटिंग कंपन्यांचा हात असल्याचंही DGGIने म्हटले आहे.

या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, या मार्केटिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने आयटीसी मंजूर करण्यासाठी एक व्यवस्था उभारली. तसेच एकमेकांच्या सुविधेसाठी बनावट बिले तयार केल्याचे समजले.

- Advertisement -

हेही वाचा – गिरगाव, माटुंगा येथे जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा खंडित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -