घरमुंबईस्तुत्य उपक्रम, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांना डाटा कार्ड आणि मोबाईलचे वाटप

स्तुत्य उपक्रम, मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांना डाटा कार्ड आणि मोबाईलचे वाटप

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अनेक मुलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात असतानाच ज्या गरीब मुलांकडे इंटरनेटचे सुविधा नाही नाही, त्यांना डाटा कार्ड आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात येणार आहे. मुंबईतील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना डाटा कार्डचे वाटप केले जाणार असून खासगी स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ)माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील मुलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईनद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. ज्या मुलांकडे मोबाईल नाहीत, त्यांना बालक मित्र संकल्पनेनुसार ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केली. तर पालक मित्र आणि शिक्षक मित्र संकल्पनेनुसार त्यांना ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु अजुनही काही मुलांकडे स्मार्टफोन असला तरी इंटनेटची सुविधा नाही. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मोबाईल रिचार्ज भरता येत नाही नाही. त्यामुळे अशा मुलांना ऑनलाईन जोडता येत नाही. त्यामुळे ‘प्रोजेक्ट मुबई’ या खासगी स्वयंसेवी संस्थेद्वारे ‘सीएसआर’ निधीतून एक लाख विद्यार्थ्यांना डाटा कार्ड आणि काही मुलांना अँड्राईड मोबाईल फोन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या एनजीओने एक लाख डाटा कार्ड आणि गरीब मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यास परवानगीही दिली आहे.

- Advertisement -

इतर ‘एनजीओं’चाही हातभार

या व्यतिरिक्त काही ‘एनजीओं’चाही हातभार सुरू आहे. ‘रोटरी क्लब’ने कुलाब्यातील शाळेतील मुलांना मदत केली आहे. दहावी इयत्तेतील ५१ विद्यार्थ्यांना त्यांनी मोबाईल फोन दिले आहेत. याशिवाय खार-सांताक्रुझमधील गझधर पार्क शाळेत मिना कौर यांनी लायन्स क्लब’च्या १७ मोबाईल गरीब विद्यार्थ्यांना दिले आहेत. आणि अनेक ठिकाणी संस्था मदत करत आहेत. तसेच आपले मुख्याध्यापक ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्याकडूनही मदत होत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील जी-उत्तर आणि एम- पूर्व विभागात दिल्लीतील ‘साझा’ या एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवला जात आहे. ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यांना मॅसेजेस पाठवून त्यांना एक एक Activity दिली जाते. जसे की ‘तुम्ही या आठवड्यात आपल्या आईबाबाचा जमा खर्च लिहा, किंवा ‘शाळेतला एखादा अविस्मरणीय दिवस’ यावर निबंध लिहा आणि आपल्या टिचरला पाठवला. एकप्रकारे शिक्षणात सक्रीय ठेवण्याचे काम ही संस्था करत आहे. त्यामुळे या भागातील मुलांची माहिती या संस्थेला दिली असून त्याप्रमाणे ते त्या मुलांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.

- Advertisement -

आज अनेक मुलांकडे फोन आहे पण डाटा कार्ड नाही. त्यामुळे अशा मुलांना ऑनलाईनला जोडता येत नाही. तसेच काहींची परिस्थिती नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे डाटा कार्ड नाही त्यांना ते देण्यासाठी परवानगी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या ‘एनजीओ’ला दिली आहे. एक लाख डाटा कार्डचे ते वितरण करणार आहेत. तसेच जे गरीबातले गरीब विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे मोबाईल नाहीत. अँड्राईड मोबाईल फोन त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. अशांना मोबाईल देण्यास परवानगी दिली. त्यानुसार आपण त्यांना माहिती देत आहोत. मोबाईल फोन हे नजीकच्या काळात उपलब्ध करून देणार आहोत. – महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -