घरमुंबईमुंबई झाली बॅनरमुक्त; १० हजार अनधिकृत बॅनर हटवले

मुंबई झाली बॅनरमुक्त; १० हजार अनधिकृत बॅनर हटवले

Subscribe

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईतील १० हजार ६९१ जाहिरातीचे फलक हटविण्यात आले आहेत.

मुंबईत राजकीय बॅनरबाजीला बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या अनधिकृत फलकांमुळे शहराला बकालपणाचे स्वरुप आले होते. परंतु रविवारी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर अखेर या राजकीय फलकांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होताच विविध भागांतील राजकीय फलक धडाधड खाली उतवण्यासाठी महापालिका कर्मचार्‍यांचे हात पुढे सरसावले. त्यामुळे आचारसंहितेमुळे का होईना मुंबई बॅनरमुक्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत १० हजार ६९१ जाहिरातीचे फलक हटविण्यात आले आहेत.

यावर करण्यात आली कारवाई

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०१९साठी १० मार्च पासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे ८ हजार ४६५ फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरील २ हजार २२६, असे एकूण १० हजार ६९१ फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.

- Advertisement -

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पथकाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आलेला आहे.


वाचा – आचारसंहितेमुळे का होईना मुंबई राजकीय बॅनरमुक्त झाली!

- Advertisement -

वाचा – राफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?; ठाण्यात बॅनरबाजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -