घरताज्या घडामोडीदिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी विशेष गाड्यांना मुदतवाढ

दिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी विशेष गाड्यांना मुदतवाढ

Subscribe

रेल्वेने, दिवा – रत्नागिरी आणि दिवा – सावंतवाडी या पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या सामान्य शुल्कासह १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत  गैरमान्सून वेळापत्रकानुसार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवा-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी या दोन्ही गाड्यांची संरचना १५ द्वितीय आसन श्रेणींची आहे.

तपशील खाली दिल्याप्रमाणे : – 

  •  दिवा- रत्नागिरी- दिवा दैनिक विशेष ०१ नोव्हेंबर  २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
    ०१५०३ विशेष दैनिक दिवा येथून ३.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.२० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
    ०१५०४ विशेष दैनिक रत्नागिरी येथून ०५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दिवा येथे १.२५ वाजता पोहोचेल.

ही गाडी पनवेल, आपटा, जिते, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, कडवई, संगमेश्वर रोड, उष्की आणि भोके या स्थानकांवर थांबणार आहे.

- Advertisement -
  •  दिवा- सावंतवाडी रोड -दिवा विशेष दैनिक ०१ नोव्हेंबर  २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे

०१५०५ विशेष दैनिक दिवा येथून ०६.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ७.४० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
०१५०६ विशेष दैनिक सावंतवाडी रोड येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १०.१० वाजता दिवा येथे पोहोचेल.

था कळंबोली, पनवेल, आपटा, जिते, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, निवसर, आडवली, वेरवली, विलावडे, सौंदळ, राजापूर रोड, खारेपाटण रोड, वैभववाडी रोड, आचिर्णे, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्ठानकांवर थांबणार आहे.

- Advertisement -

आरक्षण : वरील पूर्णतः आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित फे-यांसाठीचे सामान्य शुल्कासह बुकिंग दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. वरील विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल,


हे ही वाचा – अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची सवलत मागे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -