घर ताज्या घडामोडी Diwali 2021 : महापौर किशोरी पेडणेकर यांनी साजरी केली भाऊबीज ; मुंबईकरांना...

Diwali 2021 : महापौर किशोरी पेडणेकर यांनी साजरी केली भाऊबीज ; मुंबईकरांना दिल्या शुभेच्छा

Subscribe

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘भाऊबीज’ या सणानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज शनिवार ६ नोव्हेंबरला सकाळी भायखळा, येथील महापौर निवासस्थानी कोरोना काळात सदैव साथ देणाऱ्या विविध क्षेत्रातील भावांसोबत प्रत्यक्ष उपस्थितीत ‘भाऊबीज’ साजरी केली. तसेच सर्व भावांना दीर्घायुष्य लाभू दे ! अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

- Advertisement -

विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रातिनिधिक स्वरूपातील भाऊ यामध्ये वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.महारुद्र कुंभार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई दक्षिण विभागाचे महाप्रबंधक मनोज करे, बँक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय कार्यालय पुणे येथील व्यवसायबुद्धि विभागाचे उपमहाप्रबंधक अतुल जोशी, कालिदास कावले, भिवंडी येथील शिवस्पर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरलाल फरमन हे भाऊ
‘भाऊबीज’ कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते.


महापौरांनी सर्वप्रथम आपल्या भावांची नजर उतरविली. त्यानंतर टिळा लावून औक्षण केले. त्यानंतर लाडू भरविला आणि आपण जी ‘भाऊबीज’ भेट मला देणार आहात, ती मला न देता महापौर निधीसाठी जमा करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -


महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे मला मुंबईच्या महापौरपदाची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बँक ऑफ महाराष्ट्रने कोविड व पुराच्या काळामध्ये धान्य व कपडे यांची मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यासोबतच कोरोना काळात मुंबईकर नागरिकांची सेवा करता येणे हे माझे भाग्य असून, याकाळात मुंबईचे रक्षणकर्ते म्हणून डॉक्टर,परिचारका व कक्ष परिचर यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. त्यातील प्रातिनिधिक डॉक्टरांना आज मला’देवदूत भाऊ’ म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे महापौर म्हणाल्या.

कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ कोरोनामुळे गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली आहे.  कोविड कमी झाला असला तरी पूर्णपणे गेला नसून सर्वांनी लसवंत व्हा! ही काळाची गरज आहे. सर्व मुंबईकर नागरिकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत असून, नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला उत्सव साजरा करावा,असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यानिमित्ताने केले आहे.

 


हे ही वाचा – drug case: खरा मास्टरमाईंड सुनिल पाटील, नवाब मलिकांवर षडयंत्राचा मोहित कंबोज यांचा आरोप


 

- Advertisment -