Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईकरांना दिवाळीत बंपर गिफ्ट! MHADA कडून ४ हजार घरांची लॉटरी!

मुंबईकरांना दिवाळीत बंपर गिफ्ट! MHADA कडून ४ हजार घरांची लॉटरी!

फक्त मुंबईतील गोरेगावमध्ये ३ हजार ४०० म्हाडाच्या घरांची लॉटरी...

Related Story

- Advertisement -

मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत आपल्या हक्काचे घऱ असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र मुंबईत असणाऱ्या घरांच्या किंमती अव्वाच्या-सव्वा असल्याने सर्वसामान्य माणसांना आपले हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र सरकारच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी गृहनिर्माण योजना अंमलात आणत असेल तेव्हा हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरू शकतं. नववर्ष २०२१ मधील दिवाळी मुंबईकरांसाठी अधिक आनंदी असणार आहे. कारण मुंबईत म्हाडाकडून सर्वसामान्यांसाठी घरांची बंपर लॉटरी काढण्यात येईल. म्हाडातर्फे निघणाऱ्या बंपर लॉटरीसाठी सज्ज व्हा, दिवाळीत मुंबई म्हाडाकडून तब्बल ४ हजार घरांची सोडत काढली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यात म्हाडाला सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी घरे देण्याचे काम सोपविण्यात आले असून नववर्षातील येत्या दिवाळीत म्हाडा मुंबई मंडळाकडून सामान्य नागरिकांसाठी ही दिवाळीची विशेष भेट असणार आहे. दरम्यान, मुंबई म्हाडा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीत ४००० घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये फक्त मुंबईतील गोरेगावमध्ये ३ हजार ४०० म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात येणार असल्याने मुंबईत घऱ घेणाऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

- Advertisement -

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते की, म्हाडा लवकरच मुंबईत लॉटरी काढणार आहे. आणि यावेळी सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कांची घरे नक्की घेता येतील. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज इथं उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिका क्रमांकांची निश्चिती व वितरण बुधवारी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा -३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात आली आहे.

म्हाडा म्हणजे काय…

म्हाडा अर्थात ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (Maharashtra Housing and Area Development Authority) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. सरकार या अंतर्गत वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घरं बांधते. म्हाडा अंतर्गत आतापर्यंत राज्यात लाखो घरं बांधून झाली आहेत. (MHADA Chairman to be changed)

- Advertisement -