घरमुंबईअबब...मलबार हिलला १००० कोटी मोजून घर घेतले!

अबब…मलबार हिलला १००० कोटी मोजून घर घेतले!

Subscribe

डी मार्टचे राधाकिशन दमानींचे नाव पुन्हा एकदा चर्चेत

एक गुंतवणूकदार ते यशस्वी उद्योजक असा प्रवास असलेले डी मार्टचे प्रमुख राधाकिशन दमानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी मुंबईत तब्बल १००० कोटी रुपये मोजून मलबार हिल्समध्ये ५७५२.२२ चौरस फुटांचे हे अलिशान घर विकत घेतले आहे. राधाकिशन दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकिशन यांनी पुरचंद रॉयचंद अँड सन्स, परेशचंद रॉयचंद अँड सन्स, प्रेमचंद रॉयचंद अँड सन्स यांच्याकडून हे घर खरेदी केले. या घराचे बाजार मूल्य ७२४ कोटी रुपये असून त्यावरील विविध शुल्कासह घराची किमत १ हजार कोटीच्या घरात जात आहे. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय असून त्यांची संपत्ती जवळपास १२ हजार कोटी इतकी आहे. राधाकिशन दमानी यांची सुरुवात शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीने झाली. मात्र, एका आयडियाने त्यांचे आयुष्य बदलले. केवळ २४ तासात त्यांचे शेअर्स १०० टक्क्यांनी वाढले.

दमानी यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात 1980 च्या दशकात सुरू केली होती. मात्र, त्यांच्या कंपनीचा डी मार्टचाआयपीओ २०१७ मध्ये आला. २० मार्च २०१७ पर्यंत राधाकिशन दमानी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते. मात्र २१ मार्चच्या सकाळी जसे त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे दार ठोठावले तशी त्यांची संपत्ती १०० टक्क्यांनी वाढली. 21 मार्चला राधाकिशन दमानी यांच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला, त्यावेळी त्यांची संपत्ती अनेक श्रीमंत घराण्यांपेक्षा जास्त झाली. डी मार्टचा शेअर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला होता. त्याची पदार्पणाची किंमत 299 रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांना तब्बल १०२ टक्के रिटर्न मिळाले.

- Advertisement -

मागील १३ वर्षात लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही शेअर्सची किंमत इतकी वाढली नव्हती. दमानी यांच्या बॉल बेअरिंगचा किरकोळ व्यवसाय होता. मात्र, त्यात काही परवडत नसल्यामुळे तो बंद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावासह स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली. चांगल्या संधी शोधून छोट्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू केली. वर्ष 1990 मध्ये त्यांनी गुंतवणुकीतून कोट्यवधी कमावले होते. त्यानंतर त्यांनी किरकोळ व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य १.८८ लाख कोटी रुपये आहे.

‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ राधाकिशन दमानी हे नेहमी पांढरे कपडे परिधान करतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये ते ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून परिचित आहेत. त्यांनी 1999 मध्ये रिटेल बिझनेस सुरू केला होता, त्यावेळी कुमार मंगल बिर्ला आणि फ्युचर ग्रुपचे किशोर बियानींची पावले इकडे वळलीही नव्हती. राधाकिशन दमानींचा प्रमुख सल्ला म्हणजे, कोणत्याही कंपनीची नेहमी कर्जाची रक्कम तपासा, तसंच अल्पकाळासाठी पैसे गुंतवणे टाळा. कोणत्याही एका क्षेत्राऐवजी, प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या शेअर्सवर लक्ष ठेवा. शेअर खरेदी करण्यापूर्वी ते कधी विकायचे हे आधीच ठरवा. बाजारात उतरण्यापूर्वी आपल्याला किती रक्कम गुंतवायची आहे, हे लक्षात ठेवा, असे दमानी सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -