घरमुंबईसायबर पोलिसांचं आवाहन; WhatsApp येणाऱ्या ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

सायबर पोलिसांचं आवाहन; WhatsApp येणाऱ्या ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

Subscribe

मागील काही दिवसांपासून हा मेसेज व्हायरल होत आहे

देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना देश लॉकडाऊन केला गेला. लॉकडाऊन दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे कित्येक जण बेरोजगार झाले. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अनेक जण नोकरी आणि रोजगार शोधण्यासाठी शहरांकडे वळू लागले. परंतु बेरोजगारीच्या संकटाचा फायदा उचलून काही जण सोशल मीडियातील व्हॉट्सअपच्या माध्यमातून कित्येकांची खासगी माहिती चोरून त्याआधारे आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनादरम्यान, सोशल मीडियावरील अफवा आणि व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांचे प्रमाण देखील वाढले होते. मिळालेल्या माहितीनुसार, विविध विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहेत. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisement -

असा आहे व्हायरल होणारा मॅसेज

या व्हायरल मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे, असा दावा करण्यात आला आहे. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावे लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असे सांगून खाली एक लिंक दिलेली असते. मात्र हा मॅसेज खरा नाही, तर फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी याला बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.


देवेंद्रजी, दादा म्हणाले आता इकडे तिकडे जायचं नाही – बाळासाहेब सानप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -