घरी क्वॉरंटाइन केलेल्या रुग्णांकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून बघा – राजेश टोपे

Rajesh Tope Corona Update
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांवर बहिष्कार घातल्याची घटना मुंबई येथे घडल्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करोनाग्रस्तासोबत माणुसकिचा दृष्टीकोन ठेवला पाहीजे, असे वक्तव्य केले आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असतील तर तेथील लोकांनी भयभयीत होऊ नये, हा बरा होणारा आजार आहे. राज्यातील ८०० चाचण्यापैकी केवळ ४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बाकी इतर निगेटिव्ह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

घाटकोपर येथील एका सोसायटीमधील कुटुंब करोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर इतर रहिवाश्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. याबाबत आज टोपे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी करोनाबाधित रुग्णांसबोत दुजाभाव न करण्याचे आवाहन केले आहे. हा मुद्दा समजावून सांगताना टोपे यांनी चीनचे उदाहरण दिले. चीनने आता या आजारावर मात केली असून आपल्या शरिरातील इम्युनिटीच यावर मात करते. मात्र त्यासाठी थोडी शिस्त बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.