घरताज्या घडामोडीछाया रुग्णालयातील डॉक्टरांसहित १६ कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन

छाया रुग्णालयातील डॉक्टरांसहित १६ कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन

Subscribe

छाया रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला असला तरी डॉक्टर आणि कर्मचारी वेतनाची प्रतीक्षा करत आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेने १९७८ मध्ये सुरू केलेले कै.बी.जी. छाया रुग्णालयाचा भार, पालिकेच्या आस्थापन खर्च व त्यावरील इतर सेवा सुविधा खर्च डोईजड झाल्याने २ ऑक्टोबर २०१८ रोजी छाया रुग्णालय राज्य शासनाकडे वर्ग झाले होते. त्यानंतर या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देण्यात आला आहे. मात्र दरम्यान दोन वर्षाच्या काळात येथील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी अशा १६ कर्मचार्‍यांचा वेतन अजूनही नगरपालिका देत होती. मात्र अचानक नगरपालिकेने २ महिन्यांपासून वरील कर्मचाऱ्यांचे वेतन रोखल्याने ते वेतनाची प्रतीक्षेत आहेत.

रुग्णालय अपुरे पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय

छाया रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागात समावेशनचा प्रश्न प्रलंबित पडल्याने गेल्या दोन महिन्यांपासून येथील कर्मचार्‍यांना पगाराविना सेवा करावी लागत आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे बी.जी. छाया रुग्णालय हे ऑक्टोबर २०१६ मध्ये शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट दिली होती. तब्बल दोन वर्षानंतर २ ऑक्टोबर २०१८ रोजी शासन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या रुग्णालयाला शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन त्यासाठी विविध ४८ पदांनाही मंजूरी दिली आहे. अंबरनाथ शहर आणि तालुका परिसर तसेच कर्जत कसारा रेल्वे लाईन परिसरातील ग्रामीण भागातील एकमेव विश्वासार्ह असे प्रसुती विभागाने प्रसिध्द असलेले छाया रुग्णालय १९७८ सालात अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केले होते. त्यावेळेस या रुग्णालयात ६२ खाटा होत्या. मात्र आता याच रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन हे रुग्णालय ५० खाटांचे झाले आहे. वास्तविक वाढती लोकसंख्या आणि वाढती रुग्णांची संख्या पाहता हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

- Advertisement -

आता घर संसार चालवायचा कसा?

वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. तिथेही रुग्णावर उपचार करणार्‍या छाया रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर अशा १६ कर्मचार्‍यांचा शासन आरोग्य विभागात समावेशनाचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून येथील कर्मचारी पगार वंचित झाले आहेत. त्यामुळे आता घर संसार चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबरनाथ नगरपालिकेने गेले दोन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांचे वेतन काढणे बंद केले आहे. त्यामुळे ना राज्यशासन ना पालिकेकडून या कर्मचार्‍यांचे पगार काढले जात नसल्याने कर्मचार्‍यांची इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जोपर्यंत राज्यशासनाकडे छाया रुग्णालय वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत डॉक्टरांसाहित, नर्स व कर्मचाऱ्यांचा वेतन नगरपालिकेने करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. आम्हाला अंधारात ठेऊन हे पगार राखले आहेत. कायद्यानुसार तीन महिन्यांपूर्वी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.डॉ. श्रीकांत डोडे (छाया रुग्णालय अधीक्षक)

- Advertisement -

राज्य शासनाकडे छाया रुग्णालय दोन वर्षांपूर्वी वर्ग करण्यात आले आहे. एवढा कालावधी होऊन देखील अजूनही वर्ग होण्याची प्रक्रिया का होऊ शकली नाही. याला जबाबदार कोण याचा विचार व्हायला हवा, आम्ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देत होतो, यासंदर्भात पुन्हा आम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे याविषयी पाठपुरावा करणार आहोत.मनीषा वाळेकर (नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपालिका)


हेही वाचा – धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला जिवंत जाळले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -