Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू

मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू

Subscribe

मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरात करोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत असतानाच मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या डॉक्टरांवर माहिममधल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून हे डॉक्टर ८२ वर्षाचे होते. दरम्यान, त्यांची Covid – 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकाच कुटुंबातील ६ जण पॉझिटिव्ह

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांचा नातू १२ मार्चला ब्रिटनहून परत आला होता. त्यानंतर त्याने स्वत:ली सेल्फ क्वॉरंटाइन केले होते. मात्र, तरी देखील त्यांच्या घरातील इतरांना देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णांचा आकडा १५३ वर

- Advertisement -

करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा ७०० च्या वर गेला आहे. तर राज्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा १५३ वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


हेही वाचा – coronavirus : भारतीयांनो, अजुन एक शक्यता मावळली


- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -