Coronavirus: धक्कादायक; ठाण्यात डॉक्टरलाच कोरोनाची लागण

one positive corona patient in ahmednagar
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाण्यात एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समेार आली आहे. त्या डॉक्टरला ठाण्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरच्या कुटूंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या डॉक्टरने गेल्या आठ ते दहा दिवसांत किती रूग्णांना तपासले याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

ठाण्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हेाताना दिसत आहे. आतापर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या ही १२ होती. पण डॉक्टरची आणखी एक भर पडली आहे. काजूवाडी परिसरात या डॉक्टरचा दवाखाना आहे. त्या डॉक्टरला कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. मात्र रूग्णांच्या संपर्कातून डॉक्टरांना करोनाची बाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्या रूग्णांचाही शोध सुरू आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसात दवाखान्यात अनेक रूग्ण तपासणीसाठी आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी किती रूग्णांना तपासले याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. तसेच एखादा करोनाबधित रूग्ण त्यांच्याकडे आला होता का? याचाही तपास केला जात आहे. डॉक्टराच्या पत्नीला आणि मुलाला घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचही तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्राचा आकडा पोहोचला ४१६ वर; आज ८१ रुग्णांची नोंद

राज्यात आज नव्याने ८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून मुंबई ५७, अहमदनगर ९, पुणे ६, ठाणे ५, पिंपरी चिंचवड ३ आणि बुलढाण्यात १ रुग्ण आढळून आला आहे. तर एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.