घरताज्या घडामोडीभावाला पैसे आणायला घरी पाठवून अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केले अत्याचार!

भावाला पैसे आणायला घरी पाठवून अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केले अत्याचार!

Subscribe

कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केला असल्याची खळबळजनक घटना भिवंडीत समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात मंगळवारी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली आहे. या नाराधमावर विविध कलमांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

नक्की काय घडले? 

३० जुलै रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिची आणि तिच्या आईची तब्बेत बरी नसल्याने दोघीही गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान याच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींनाही तपासून आणि उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी मुलीची तब्बेत बरी नव्हती मात्र घरी काम असल्यामुळे मुलीच्या आईने तिच्या सोबत १० वर्षाच्या मुलाला पाठवले होते. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान डॉ. बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही. तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले आणि दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील कामानिमित्त बाहेर पाठवले होते. मुलीच्या सोबत गेलेल्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवले होते. यादरम्यान दवाखान्यात कुणीही नसल्याचा फायदा उचलत या डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला. सदर प्रकार पीडित मुलीने आपल्या मावशीला सांगितला असता मावशीला धक्काच बसला आणि तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून सर्व घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टरबाबत तक्रार केली असता शांतीनगर पोलिसांनी डॉक्टर विरोधात भादंस कलम ३५४ (ए), ३७६ (२) (इ), ३७६ (सी) (डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र डॉक्टरला अजूनही अटक केली नसून याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी तिघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -