घरमुंबईकोरोनाकाळात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी हे देवदूतच! -आदित्य ठाकरे

कोरोनाकाळात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी हे देवदूतच! -आदित्य ठाकरे

Subscribe

सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या विस्तारित वसतिगृह इमारतीचे लोकार्पण आणि प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता पार पडला.

कोरोनामध्ये अव्याहतपणे काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी हे देवदूत आहेत, असे गौरोद्गार सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या विस्तारित वसतिगृह इमारतीचे लोकार्पण आणि प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाच्या विस्तारित वसतिगृह इमारतीचे लोकार्पण आणि प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता पार पडला. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. रूग्णालयाला ७५ वर्षे झाल्याबद्दल तयार केलेल्या एका विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध लोकोपयोगी विकास कामे ही आधी आपण देशाचे नागरिक आहोत, मुंबईकर आहोत; याच भावनेतून करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. कोरोना काळात अविरतपणे रुग्णसेवा करणारे रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी हे जणू देवच असल्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांचे आभार मानले.

- Advertisement -

शहरातली लोकसंख्या वाढत असल्याने त्याचा सोयीसुविधांवर ताणही वाढत आहे. त्यामुळे पालिकेने वाढत्या लोकसंख्येकरीता वैद्यकीय सोयीसुविधांचा अधिकाधिक विस्तार कसा करता येईल आणि त्यांचे आधुनिकीकरण कसे करता येईल, याचाच विचार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे येथील महत्वाच्या अशा सर्वच महापालिका रुग्णालयांचा पुनर्विकास आणि विस्तार होणार आहे.

रुग्णालयाचा पाच टप्प्यात होणार पुनर्विकास

सायन रुग्णालयाचा पुनर्विकास ५ टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षामार्फत पुनर्विकासाच्या कामातील टप्पा १ (अ) व १ (ब) अंतर्गत घेतलेली कामे ६१६.६२ कोटी किमतीची आहेत. यात १३.८१ लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र आहे. आणि ६० महिन्यात कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -