डॉक्टरांना वैयक्तिक संरक्षक साधनं कमी दरात उपलब्ध करावेत – आयएमए

भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर
भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एन ९५ मास्क करणाऱ्यांचा काळाबाजार सुरू झाला. त्यानंतर अव्वाच्यासव्वा या अत्यावश्यक गोष्टींची किंमत वाढली. त्यामुळे, आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने एन ९५ मास्क, गाऊन वाजवी दरात उपलब्ध करावेत अशी मागणी केली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे, मास्क आणि पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षक साधनांची मागणी सर्व हॉस्पिटलमधून वाढली आहे. त्यामुळे, अशा पद्धतीची मागणी केली गेल्याचं आयएमएकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी डॉक्टरांना आपली ओपीडी, क्लिनिक्स आणि दवाखाने बंद न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर, आता इंडियन मेडिकल असोसिएशनने एक परिपत्रक काढून खासगी डॉक्टरांनी दवाखाने का बंद ठेवले होते? याची कारणं दिली आहेत. त्याचप्रमाणे आयएमए महाराष्ट्रकडून राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे.

जेष्ठ डॉक्टरांना एपिडेमिक कायद्यातील तरतूदीतून वगळावे –

महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनाच्या साथीमध्ये सर्वोतपरी वैद्यकीय मदत करण्यास आयएमए कटिबद्ध आहे. राज्यातील खासगी डॉक्टरांचे दवाखाने आणि क्लिनिक सुरु राहावेत यासाठी आयएमएतर्फे आरोग्यमंत्री आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली की, सर्व डॉक्टर आणि त्यांचा मेडिकल तसंच पॅरामेडिकल स्टाफ यांना सरकारमान्य ओळखपत्र द्यावीत. महाराष्ट्रातील डॉक्टरांना एन९५ मास्क, गाऊन आणि इतर वैयक्तिक संरक्षक साधनं वाजवी दरात दर आठवड्याला उपलब्ध करून द्यावीत. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ डॉक्टरांना एपिडेमिक कायद्यातील तरतूदीतून वगळावे. सोसायटी किंवा घरमालकांना एखाद्या डॉक्टरकडे कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यास राहती जागा रिकामी करण्याची सक्ती करू नये. खासगी दवाखान्यात कोरोना रूग्ण आढळल्यास डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ यांच्याबाबत काय उपचार करावेत याबाबत योग्य तो निर्णय आयसीएमआरच्या मदतीने घ्यावा.