घरमुंबईमुंबईकरांनो घरबसल्या मिळवा प्रॉपर्टी कार्ड

मुंबईकरांनो घरबसल्या मिळवा प्रॉपर्टी कार्ड

Subscribe

डिजिटल स्वाक्षरीच्या प्रॉपर्टी कार्डची सुविधा

ब्रिटीशकाळापासूनचे मुंबईतील मालमत्तांचे दस्तावेज अखेर आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मुंबईकरांना आता प्रॉपर्टी कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सेतु सुविधा केंद्रातल्या फेर्‍या त्यामुळेच नक्की कमी होतील. डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड हे घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. इज ऑफ डुइंग बिझनेसच्या निकषासाठी पात्र ठरणारा देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.

जागतिक बँकेच्या निकषांनुसार व्यापार सहज करण्यासाठीच्या निकषांमध्ये प्रॉपर्टी कार्डची ऑनलाईन उपलब्धतता हा एक महत्वपुर्ण निकष होता. जागतिक बँकेने इज ऑफ डुइंग बिझनेस या निकषाचे मूल्यमापन करण्यासाठी मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांची निवड केली होती. त्यामध्ये मुंबई जिल्हा आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध असणे हा निकष होता. मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व मालमत्ता या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या दिवसांमध्ये यासाठीचे शुल्क आणि पेमेंट गेटवे याचे काम पुर्ण होईल. त्यानंतर कोणतेही प्रॉपर्टी कार्ड हे शासनाने निश्चित केलेले शुल्क भरून उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पावर गेल्या वर्षभरापासून काम सुरू होते. मुंबई जिल्ह्यातील सुमारे 26 हजार मालमत्ता आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. या सगळ्या मालमत्तांच्या नकाशांचे डिजिटल स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी या मालमत्ता डिजिटल नकाशाच्या स्वरूपात पाहण्यासाठी सध्या उपलब्ध आहेत अशी माहिती मुंबई नगर भूमापन व भूमी अभिलेख (शहर) विभागाचे अधिक्षक महेश इंगळे यांनी दिली. एनआयसी पुणे यांनी सगळ्या प्रकल्पासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पुरविले आहे. जवळपास 1918 पासूनचे प्रॉपर्टी कार्ड मुंबई शहरात उपलब्ध आहेत. हे सगळे जुने दस्तावेज डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात अतिशय आव्हानाचे काम होते. लवकरच शासकीय शुल्कासह हे दस्तावेज घरबसल्या उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले. मुंबईतील मालमत्तांच्या पुनर्विकासाच्या वेळी मुंबई महापालिकेला तसेच शासनाच्या विविध विभागांना प्रॉपर्टी कार्ड गरजेचे असते. आता प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा मोठा वेळ वाचेल असेही त्यांनी सांगितले.

नकाशे ऑनलाईन

मुंबई शहर जिल्ह्यात एकुण 26 हजार मालमत्ता आहेत. या सगळ्या मालमत्तांचे नकाशेही येत्या दिवसांमध्ये ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. एकुण 790 आलेख हे डिजिटल स्वरूपात तयार करण्यासाठी स्कॅनिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अतिशय जुने आणि जीर्ण होणार्‍या दस्तावेजांना डिजिटल स्वरूप उपलब्ध झाल्याने आता या दस्तावेजांचे आयुष्यमान वाढणार आहे.

- Advertisement -

.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -