घरमुंबईभटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ७ 'डॉग व्हॅन'; २ कोटींचा खर्च

भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ७ ‘डॉग व्हॅन’; २ कोटींचा खर्च

Subscribe

एका कुत्र्याला पकडण्यासाठी ६८० रुपये प्रमाणे ३४ हजार ९४४ कुत्र्यांना पकडण्यासाठी २ वर्षांकरिता २.३७ कोटी रुपये खर्चण्यात येणार

मुंबई शहर उपनगरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी व त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिका खासगी कंत्राटदाराकडून मनुष्यबळासह ७ डॉग व्हॅन उपलब्ध करणार आहे. एका कुत्र्याला पकडण्यासाठी ६८० रुपये प्रमाणे ३४ हजार ९४४ कुत्र्यांना पकडण्यासाठी २ वर्षांकरिता २.३७ कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत.

मुंबईत विशेषतः झोपडपट्टी परिसरात भटक्या कुत्र्यांचा नोकरदार वर्ग, महिला, मुली, लहान मुले, अगदी वयोवृद्ध यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. भल्या पहाटे सकाळी कामाला जाताना अथवा कामावरून रात्री उशिराने परतणाऱ्या व्यक्तींना भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ज्यांना हे भटके कुत्रे चावतात त्यांना खूपच शारीरिक वेदना होतात. रेबीज रोग झाल्यास त्यांच्या जीवावर बेतते. मुंबई महापालिका काही वर्षांपूर्वी उपद्रवी कुत्र्यांना पकडून त्यांना जीवे मारत असे. मात्र प्राणीमित्र संघटना व मनेका गांधी यांनी आक्षेप घेतल्याने व न्यायालयाने आदेश दिल्याने उपद्रवी कुत्र्यांना जीवे मारणे बंद करण्यात आले. मात्र न्यायालयाने कुत्र्यांना ठार न मारता त्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करीत आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली तेव्हा या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७४ एवढी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी २५ हजार ९३५ कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात आले नव्हते. त्यामध्ये, १४, ६७४ नर तर ११,२६१ मादींचा समावेश होता. वास्तविक, निर्बीजीकरण न केलेल्या एक मादी चार पिल्ले जन्मला घालते. त्यातूनच ही पिल्ले पुढे वर्षभरात प्रजननक्षम होतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होते.

दरम्यान, दर वर्षाला किमान ३० टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार वर्षभरात ३२ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाल्यास भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालणे शक्य होऊ शकते. सद्या अशासकीय संस्था या निर्बीजीकरणासाठी वर्षभरात फक्त १८ ते १९ हजारापर्यतच भटक्या कुत्र्यांची धरपकड करून त्यांचे निर्बिजीकरण करतात. त्यामुळे उर्वरीत कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी व त्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ व डॉग व्हॅन यांची संख्या अपुरी पडत आहे.

- Advertisement -

५०% कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळेच आता पालिकेने ७ परिमंडळात म्हणजे २४ वार्डात भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी ७ डॉग व्हॅन आणि मनुष्यबळ खासगी कंत्राटदाराकडून २ वर्षांसाठी भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंत्राटदार मे. आरती कॉर्पोरेशन यांना २ कोटी ३७ लाख रुपये देण्यात येणार आहेत. यासंदर्भांतील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.


दादर, लोअर परळमध्ये आज पाणी नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -